नागराज मंजुळेचा 'सैराट' सिनेमा प्रदर्शित होऊन चार महिने उलटले, मात्र प्रेक्षकांमधील क्रेझ तसूभरही कमी झालेली नाही. आर्ची-परशाची प्रेमकहाणी अनेकांचा मनात कायम आहे.
2/6
काही दिवसांपूर्वी सैराटच्या गाण्यावर प्री-वेडिंग व्हिडीओचा ट्रेण्ड होता. त्यातच आता 4-5 वर्षांच्या चिमुरड्यांना घेऊन 'सैराट झालं जी' हे जसंच्या तसं शूट केलं आहे.
3/6
बॉक्स ऑफिसवर कमाईचा विक्रम मोडणाऱ्या 'सैराट'मधली गाणी प्रत्येकांच्या ओठांवर आहेत. लग्नाची वरात असो किंवा शाळा-कॉलेजचं गॅदरिंग, 'सैराट'चं एकतरी गाण वाजल्याशिवाय कार्यक्रम पूर्णच होतं नाही. आता प्री-वेडिंग व्हिडीओनंतर आता किड्स व्हर्जनही यू ट्यूबवर धुमाकूळ घालत आहे.
4/6
महत्त्वाचं म्हणजे 12 ऑगस्ट अपलोड केलेल्या या व्हिडीओला 19 दिवसात तब्बल 2 लाख 10 हजारांहून अधिक व्ह्यूव मिळाले आहेत.
5/6
सुयश वाघमारे या तरुणाने चिमुड्यांच्या गाण्याचा व्हिडीओ दिग्दर्शित केला आहे. तर सोहम पिसडूरकरने परशा आणि श्रावणी कापसेने आर्ची साकारली आहे.
6/6
गाण्यातील तेच लोकेशन, तेच सीन हूबेहूब या व्हिडीओमध्ये चित्रीत करण्यात आले आहेत. मात्र यातील आर्ची-परशा वेगळे आहेत.