एक्स्प्लोर
माझा सन्मान: महाराष्ट्राची शान वाढवणाऱ्या रत्नांचा गौरव
1/10

पाणी फाऊंडेशनः मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमीर खान आणि सत्यमेव जयते सारख्या कार्यक्रमातून सामाजिक समस्यांवर तोडगा शोधणारे दिग्दर्शक सत्यजीत भटकळ. या दोघांनीही दुष्काळाला कायमचं हद्दपार करण्याचं स्वप्न पाहिलं आणि जन्म झाला पाणी फाऊंडेशनचा. जर महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करायचं असेल, तर प्रत्येक गावात जलसंधारणाची कामं झाली पाहिजे, दुष्काळमुक्तीचा हा साधा आणि सरळ फॉर्म्युला पाणी फाऊंडेशननं अवलंबला. जलसंधारणाच्या कामासाठी महाराष्ट्रानं हातात कुदळ आणि फावडं धरावं म्हणून सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा आयोजित करण्यात आली. बीडमधलं अंबाजोगाई, अमरावतीमधलं वरूड, आणि साताऱ्यामधलं कोरेगाव. अशा तीन तालुक्यातली ११६ गावं स्पर्धेत सहभागी झाली. पाणी फाऊंडेशनच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक गावानं सर्व शक्ती पणाला लावून जलसंधारणाची कामं केली. आकाशातून बरसणारा प्रत्येक थेंब जिरवण्यासाठी गावोगोवी जणू श्रमदानाच्या जत्रा भरत होत्या. पावसाची पहिली सर कोसळली अन् जलसंधारणाची कामं झालेली गावं पाणीदार झाली. अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचं शिवधनुष्य पाणी फाऊंडेशननं उचललंय. आणि हे शिवधनुष्य ते यशस्वीरित्या पेलणार यात तीळमात्र शंका नाही. महाराष्ट्राला दुष्काळमुक्तीचा मार्ग दाखवणाऱ्या पाणी फाऊंडेशनला ‘माझा’चा सलाम..
2/10

डॉ. सुधीर पटवर्धन-चित्रकारः पेशाने डॉक्टर.. पण तरीही रेषेच्या विविधतेत सतत रमणारी अशी ही व्यक्ती. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार डॉ. सुधीर पटवर्धन.. चित्रांची वेगळी आणि सोपी, पण काहीतरी सांगणारी अशी शैली.. जी आज ही समीक्षकांपासून सामान्यांपर्यंत सर्वांना भावणारी आहे.. चित्रकार सुधीर पटवर्धन लोकांच्या खासगी आणि सामाजिक जीवनाचा चित्रातून एकाच वेळी वेध घेतात. त्यांच्या चित्रांत मानव कधी संघटित तर कधी विघटित स्थितींमध्ये आढळतो. पटवर्धनांच्या कॅनव्हासवर औद्योगिकीकरणाच्या रेट्यात मागे हटत गेलेला निसर्ग दिसतो.. चित्रांतील व्यक्ति या कष्टकरी, कारखान्यांतले कामगार, बांधकामावरचे मजूर, साधे प्रवासी अशा प्रकारची असतात. अभिजात ग्रंथ वाचणारे, चर्चा करणारे, काही चित्रकार असतात. त्याच गटातले चित्रकार डॉ. सुधीर पटवर्धन. वाचनाची आवड असल्याने तरूणपणी कार्ल मार्क्सच्या विचारांचा पगडा त्यांच्या मनावर झाला. त्याच प्रमाणे कामू, सार्त्र आणि सिमॉन द बोवा हे लेखक मी वाचले असे ते सांगतात. त्या वाचनाचा, त्या विचारांचा माझ्या कलेवर परिणाम झाला असे ही ते म्हणतात. प्रख्यात चित्रकार सुधीर पटवर्धन यांच्या चित्राला दाद देणारे दर्दी हे केवळ भारतातच नाही तर परदेशातही आहेत. अनेक जाणकारांच्या संग्रही पटवर्धवन यांच्या चित्रांचं संग्रह असणं हे कलेच्या वर्तुळात अत्यंत मानाचं समजलं जातं. अनेकांना चित्रशिल्प बघायला आवडते पण त्यासाठी चांगल्या संधी मिळत नाही. ही उणीव लक्षात घेऊन त्यांनी एक उपक्रम राबवला.. ‘विस्तारणारी क्षितिजे या आधुनिक आणि समकालीन भारतीय केलेचे फिरते प्रदर्शनाचं आयोजन आठ वेगवेगळ्या शहरात त्यांनी केल होतं. अशा या जगविख्यात प्रतिभावंत चित्रकाराला एबीपी माझाचा मानाचा मुजरा..
Published at : 01 Jul 2016 09:17 PM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
वाशिम
भविष्य
महाराष्ट्र
निवडणूक























