या विजयासोबतच विजय चौधरीने नरसिंग यादवच्या सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी जिंकण्याच्या विक्रमाशीही बरोबरी साधली.
6/10
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावचा विजय चौधरी ट्रिपल महाराष्ट्र केसरी ठरला आहे. पुण्यातल्या वारजे गावात झालेल्या स्पर्धेत विजय चौधरीने अभिजित कटकेवर मात करुन सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीची गदा उचलण्याचा मान मिळवला.
7/10
येत्या फेब्रुवारीत 'हिंद केसरी' आणि मुंबई महानगर पालिका निवडणुकीची कुस्ती आहे. ती कोण जिंकणार, असं पत्रकारांनी विचारलं असता दोन्ही कुस्त्या आम्हीच जिंकणार, अशी मिश्किल प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.
8/10
विजयच्या नोकरीबाबत आता काही आश्वासन देण्यापेक्षा काही तरी कृती करु, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
9/10
'हिंद केसरी' किताब जिंकून महाराष्ट्राची मान आणखी उंच कर, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी विजयला शुभेच्छा दिल्या.
10/10
सलग तिसऱ्यांदा 'महाराष्ट्र केसरी' होण्याचा मान मिळवणाऱ्या विजय चौधरी आणि त्यांचे प्रशिक्षक माजी 'महाराष्ट्र केसरी' अमोल बुचडे यांनी आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेनाभवन येथे भेट घेतली.