एक्स्प्लोर
इंदूर कसोटीत भारताचा 321 धावांनी विजय
इंदूर: इंदूरः विराट कोहलीच्या टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धची तिसरी कसोटी जिंकून इंदूरमध्ये विजयादशमी साजरी केली. भारताने ही कसोटी 321 धावांनी जिंकून मालिकेतही 3-0 असं निर्भेळ यश मिळवलं.
इंदूर कसोटीत टीम इंडियाने न्यूझीलंडला विजयासाठी 475 धावांचं आव्हान दिलं होतं. भारतानं आपला दुसरा डाव तीन बाद 216 धावांवर घोषित केला. भारताकडून चेतेश्वर पुजारानं शानदार शतक झळकावलं.
पुजारानं 147 चेंडूंत नऊ चौकारांसह नाबाद 101 धावांची खेळी रचली. पुजाराचं कसोटी कारकीर्दीतलं हे आठवं शतक ठरलं. त्याआधी गौतम गंभीरनं 56 चेंडूत सहा चौकारांसह 50 धावांची खेळी केली. गंभीरचं कसोटी कारकीर्दीतलं हे 22वं अर्धशतक ठरलं.
-----------
इंदूर कसोटीत गौतम गंभीर आणि चेतेश्वर पुजाराच्या अर्धशतकांच्या जोरावर टीम इंडियानं न्यूझीलंडवर भक्कम आघाडी घेतली. भारतानं आतापर्यंत दोन बाद 132 धावांची मजल मारली असून न्यूझीलंडवर एकूण 385 धावांची आघाडी घेतली आहे.
- चेतेश्वर पुजारानं झळकावलं शतक, भारताचा दुसरा डाव 216 धावांवर घोषित, न्यूझीलंडसमोर विजयसाठी 475 धावांचं आव्हान
चेतेश्वर पुजारा 54 आणि विराट कोहली 3 धावांवर खेळत आहे. त्याआधी गौतम गंभीरनं 56 धावांत सहा चौकारांसह 50 धावांची खेळी केली. गंभीरचं कसोटी कारकीर्दीतलं हे 22वं अर्धशतक ठरलं. अर्धशतक झळकावल्यानंतर गंभीर जीतन पटेलच्या गोलंदाजीवर बाद झाला.
ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनच्या प्रभावी माऱ्याच्या जोरावर भारताने इंदूर कसोटीत न्यूझीलंडला पहिल्या डावात 299 धावांवरच रोखलं. त्यामुळं भारताला पहिल्या डावात 258 धावांची आघाडी मिळाली होती. अश्विननं सहा विकेट्स काढल्या तर रविंद्र जाडेजानं 2 फलंदाजांना माघारी धाडलं.
त्यानंतर टीम इंडियानं फॉलो ऑन न देता परत फलंदाजीसाठी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. भारताने तिसऱ्या दिवसअखेर बिनबाद 18 धावांची मजल मारली असून टीम इंडियाची न्यूझीलंडवरील आघाडी 276 धावांची झाली आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा मुरली विजय 11 धावांवर तर चेतेश्वर पुजारा एक धावेवर खेळत होता. गौतम गंभीरला खांद्याच्या दुखापतीमुळं 6 धावांवर रिटायर्ड हर्ट व्हावं लागलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement