एक्स्प्लोर
डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी गुजरात सज्ज, अहमदाबादच्या रस्त्यांवर मोदी-ट्रम्प यांचे पोस्टर्स
1/6

डोनाल्ड ट्रम्प आपल्या पत्नीसह चार तास अहमदाबादमध्ये थांबतील. त्यानंतर ट्रम्प आग्र्याला रवाना होतील.
2/6

रोड शोदरम्यान एनएसजीचे कमांडर आणि अमेरिकेचे स्नायपर्स त्याठिकाणी तैनात असतील. हेलिकॉप्टरच्या मदतीने संपूर्ण शहरावर नजर ठेवली जाणार आहे.
3/6

अहमदाबाद एअरपोर्टवर डोनाल्ड ट्रम्प यांचं स्वागत केलं जाणार आहे. एअरपोर्ट ते साबरमती आश्रमपर्यंत मोदी आणि ट्रम्प रोड शो काढणार आहेत.
4/6

डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदींसह ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया या देखील पोस्टर्समध्ये झळकत आहेत.
5/6

डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एकत्र मोठमोठे बॅनर्स अहमदाबादमध्ये लावण्यात आले आहे. अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियममध्ये होणाऱ्या कार्यक्रमाला आता 'केम छो ट्रम्प'च्या ऐवजी 'नमस्ते ट्रम्प' असं नाव देण्यात आलं आहे.
6/6

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प येत्या 24 फेब्रुवारीला दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. गुजरातच्या अहमदाबादमध्ये त्यानिमित्त जोरदार तयारी सुरु आहे. अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणेनेही भारतातील तयारीचा आढावा घेतला.
Published at : 18 Feb 2020 08:41 PM (IST)
View More























