त्यामुळे येत्या काळात कमीत कमी खर्चात या विभागांतील कोविड रूग्णांना इथं माफक दरांत योग्य ते वैद्यकीय उपचार दिले जातील.
2/8
महाराष्ट्रातलं पहिलं खाजगी कोविड केअर सेंटर मुंबईतल्या कांदिवली भागात उभारण्यात आलंय.
3/8
येथे काम करणाऱ्या डॉक्टर्ससाठीही जवळच राहण्याची सोय करण्यात आली आहे. जनरल वॉर्ड सह ट्विन शेअरिंग, ट्रिपल शेअरिंग रूम्स ही इथं तयार होत आहेत.
4/8
जैन मुनी नमरमुनी यांच आध्यात्मिक केंद्र असलेल्या 'पावनधाम' या पाच मजली इमारतीत हे शंभर बेड्सचं राज्यातील पहिलं खाजगी कोविड केअर सेंटर उभारण्यात आलं आहे.
5/8
कोरोनाशी मुकबला करण्यात सरकारी यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करत असताना आता खाजगी संस्थांनीही या कामात उतरण्यास सुरूवात केलीय.
6/8
याठिकाणी उपलब्ध असलेले सर्व बेड्स हे ऑक्सिजन सप्लाय, पोर्टेबल एक्स रे मशिन आणि आयसीयूत असलेल्या इतर अद्ययावत सोयींनी युक्त आहेत.
7/8
भाजप खासदार गोपीळ शेट्टी आणि शिवसेनेचे माजी सार्वजनिक आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हे राज्यातलं पहिलं खाजगीकोविड केअर सेंटर तयार झालंय.
8/8
अवघ्या तीन दिवसांत हे काम पूर्ण झालं असून या कामासाठी जवळपास 60 लाखांचा खर्च आला आहे.