एक्स्प्लोर
Advertisement

'बागी 2' ची कमाई पाहून अक्षय कुमारसह दिग्गज आश्चर्यचकित

1/5

अभिनेता वरुण धवननेही या सिनेमाचं कौतुक केलं. बागी 2 च्या संपूर्ण टीमला शुभेच्छा. हा सिनेमा पाहण्यासाठी मी आणखी वाट पाहू शकत नाही. हे तुमच्या कठिण मेहनतीचं फळ आहे, असं वरुण धवन म्हणाला.
2/5

'बागी 2' ने शुक्रवारी भारतात 25.10 कोटींची कमाई केली. बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी एवढी कमाई करणारा हा या वर्षातला पहिलाच सिनेमा आहे. तर दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 20.40 कोटींचा गल्ला जमवला. या सिनेमाची दोन दिवसांची कमाई 45.50 कोटी झाली आहे. कमाईचे आकडे पाहून आश्चर्यचकित झालेल्या अनेकांनी अभिनेता टायगर श्रॉफचं अभिनंदन केलं आहे.
3/5

तू देशातील प्रेक्षकांचं मनोरंजन करतो तेव्हा काय होतं, हे पहिल्या दिवसाच्या कमाईने दाखवून दिलं आहे. टायगर, दिशा, अहमद खान आणि साजिद भाई यांनी उत्कृष्ट काम केलं आहे. कमर्शिअल सिनेमा कधीच संपू शकत नाही, हे साजिद भाईंनी पुन्हा एकदा सिद्ध केलं, असं ट्वीट अभिनेता अर्जुन कपूरने केलं.
4/5

जंगलात नवा राजा आला आहे आणि तो जबरदस्त कमाई करतोय, असं अभिनेते अनिल कपूर म्हणाले. त्यांनी बागी 2 च्या टीमचं कौतुक केलं.
5/5

सिनेमाची पहिल्या दिवसाची कमाई पाहून अभिनेता अक्षय कुमारने ट्वीट केलं. आमच्या इंडस्ट्रीतही टोनी जा आहे, असं आता बॉलिवूड गर्वाने म्हणू शकतं. तुझी अॅक्शन जबरदस्त आहे, असं अक्षय कुमार म्हणाला.
Published at : 01 Apr 2018 02:10 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
बीड
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
