HBX ची प्रतिस्पर्धा महिंद्राच्या KUV सोबत होणार आहे. दरम्यान, HBX गाडीला ग्राहकांचाही प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
2/7
HBX कारला यावर्षाच्या शेवटपर्यंत पेट्रोल इंजिनसोबत लॉन्च करण्यात येणार आहे. डिझल इंजिनसोबत या कारची किंमत थोडी महाग असू शकते.
3/7
HBX कारचा लूक आकर्षक आहेच, पण ही आतमधूनही स्पेशिअस दिसत आहे. ही कार टाटाच्या सर्वात नवीन डिझाइन्सपैकी एक आहे. यामध्ये यूनिक कंपास लावण्यात आलं आहे. याव्यतिरिक्त कारचं इंटीरियर डिझाइनही अत्यंत आकर्षक आहे.
4/7
HBX कारचा इंस्ट्रूमेंट क्लस्टरही आधुनिक टाटाच्या गाड्यांप्रमाणेच आहे. ज्यामध्ये अल्ट्रोजदेखील आहे. कारमध्ये डिजिटल स्क्रिनदेखील आहे.
5/7
HBX कारचे टायर पाहून असं वाटतं की, कच्च्या रस्त्यावरूनही ही अगदी सहज चालवणं शक्य आहे.
6/7
भारतात ऑटो एक्सपो 2020 सीझन गुरूवारपासून सुरू झाला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही ऑटो एक्सपोच्या सर्वत्र चर्चा पाहायला मिळतात. ऑटो एक्सपोमध्ये टाटा कंपनीच्या वतीने अनेक गाड्या लॉन्च करण्यात आल्या आहेत. टाटाने मायक्रो एसयूव्ही या सीझनमध्ये लॉन्च केली. ही गाडी लवकरच मार्केटमध्ये लॉन्च करण्यात येणार आहे. तसेच या गाडीची किंमत स्वस्त असेल असं कंपनीच्या वतीने सांगण्यात आलं आहे.
7/7
HBX कार लहान असली तरीही आपलं डिझाइन आणि लूक्समुळे ती फार आकर्षक आणि मोठी दिसत आहे. ही साइड क्रॉसओव्हर सारखी दिसते. परंतु, तरीही या कारचा लूक एखाद्या मोठ्या एसयूव्हीप्रमाणे दिसतो.