एक्स्प्लोर

मोठी बातमी : रोहित पवारांचा FIR का घेत नाही, सरकार संशयाची भूतं नाचवतंय, सुनेत्रा वहिनींनी बोललं पाहिजे, राज ठाकरेंचं रोखठोक भाष्य

पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, अजित पवार गेल्यानंतर अनेक संशयाची भूत फिरत आहेत. अपघात हा धुक्याने झाला की धोक्याने हे सुरू आहे.

मुंबई: दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी व्हावी, तसेच संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत आमदार रोहित पवार यांनी बारामती पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडला होता. मात्र, पोलिस अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करण्यास अनुकूलता दर्शवली नाही. त्यानंतर, रोहित पवारांनी (Rohit Pawar) आज मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेऊन याविषयी चर्चा केली. तसेच, या लढ्यात राज ठाकरे (Raj Thackeray) हे पूर्ण ताकदीनिशी आमच्या पाठीशी उभं राहतील, असा विश्वासही व्यक्त केला होता. त्यानंतर, आता राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन रोहित पवारांच्या भूमिकेवर परखडपणे भाष्य केलं. पोलीस रोहित पवारांचा FIR का घेत नाहीत, सरकारच संशयाची भूतं नाचवतंय, असे म्हणत सरकारला लक्ष्य केलं. 

पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, अजित पवार गेल्यानंतर अनेक संशयाची भूत फिरत आहेत. अपघात हा धुक्याने झाला की धोक्याने हे सुरू आहे, रोहित पवार यांनी सगळ्या टेक्निकल गोष्टी सांगितल्या. पण त्यात एक बाब अशी की, त्यांनी तीन ठिकाणी तक्रार करण्याचा प्रयत्न केला पण पोलीस तक्रार घेत नाही, गुन्हा दाखल करत नाहीत. इथेच संशय तयार होतो, असे राज ठाकरे यांनी म्हटले. मरीन ड्राईव्हला एक अधिकारी FIR लिहित होते, मग डीसीपी आले आणि म्हणाले की तक्रार घ्यायची नाही, हे काय आहे? जर त्यांच्या कुटुंबातून कोणाला तरी तक्रार द्यायची आहे, मग सरकार का अडथळे आणत आहे? सुनेत्रा वहिनी ह्या आता सरकारमध्ये आहेत. राज्यात सांगितले जाते की कुठेही FIR नोंदवू शकता. पण FIR नोंदवायला गेलेला माणूस त्याची तक्रार घेतली जात नाही मग यातच काळ बेरं आहे का? असे सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केले आहेत.  

FIR का नोंदवून घेतला जात नाही

ब्लॅक बॉक्सचेही अजून काही कळले नाही, वितळून कितीही विस्कळीत झाले तरी ब्लॅक बॉक्सला काही होत नाही. पण, सरकार संशयाची भूत नाचवत आहे. सरकार का FIR नोंदवू देत नाही, सगळ्या टेक्निकल गोष्टी बाजूला ठेवल्या पण FIR का नोंदवू घेतला जात का नाही? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. आमदारांचा FIR पोलीस घेत नाहीत, मग सर्वसामान्यांचा काय?

सुनेत्रा वहिनी, मुख्यमंत्र्‍यांनी बोललं पाहिजे

हे राजकारण नाही आहे, राजकारण बाजूला ठेवूया पण FIR करू का देत नाही. सध्या अधिवेशन सुरू आहे, त्यात ही गोष्ट मांडावी. लोकसभेचेही अधिवेशन आहे, तिथेही राष्ट्रवादीच्या लोकांनी मुद्दे मांडावे. अजित पवार यांच्यासारख्या माणसाचा अपघात आहे, आणि त्यासाठी FIR करण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत . अधिकाऱ्यांवर दबाव का आहे? एकच FIR आहे ना फक्त, त्यावर सरकार का घाबरत आहे. सुनेत्रा वहिनींनी यावर बोलले पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी तर बोलले पाहिजे, असे म्हणत राज ठाकरेंनी रोहित पवारांची भक्कमपणे बाजू घेतली.

हेही वाचा

रोहित पवार मुख्यमंत्र्यांना भेटले; कंपनीवर गुन्हा दाखल करण्याबाबत चर्चा, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

About the author अजय माने

अजय माने
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rajya Sabha Election : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
मोठी बातमी! शरद पवारच राज्यसभेचे उमदेवार, सुप्रिया सुळेंकडून घोषणा; काँग्रेस अन् ठाकरेंच्या शिवसेनेचा पाठिंबा
मोठी बातमी! शरद पवारच राज्यसभेचे उमदेवार, सुप्रिया सुळेंकडून घोषणा; काँग्रेस अन् ठाकरेंच्या शिवसेनेचा पाठिंबा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 मार्च 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 मार्च 2026 | बुधवार
Bihar : बिहारमध्ये खांदेपालट! नितीश कुमार राज्यसभेवर, तर मुख्यमंत्री भाजपचा होणार? निशांत कुमारांचीही राजकारणात एन्ट्री 
बिहारमध्ये खांदेपालट! नितीश कुमार राज्यसभेवर, तर मुख्यमंत्री भाजपचा होणार? निशांत कुमारांचीही राजकारणात एन्ट्री 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Iran vs America : ब्रिटनच्या वेगळ्या भूमिकेवरुनही ट्रम्प यांचा संताप
Special Report Raj Thackeray - Uddhav Thackeray : मनसे-ठाकरेसेनेतील नाराजीवर तोडगा निघाला?
Special Report Rajya Sabha : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा
Jalgaon Banana : केळीचे दर 2.500 रुपयांवरुन 1500 रुपयांवर, युद्धाचा उत्पादकांना फटका
Ajit Pawar plane crash spot Baramati : AIB च्या अहवालात विमान झाडाला धडकल्याचा उल्लेख, फॅक्ट काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना,वानखेडेवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून प्रेक्षकांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी 
भारत- इंग्लंड सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून सूचना जारी
तामिळनाडूत द्रमुक आणि काँग्रेसचं जमलं, राज्यसभेची एक जागा काँग्रेसला मिळणार, विधानसभेसाठी द्रमुकनं किती जागा सोडल्या?
तामिळनाडूमध्ये काँग्रेस-द्रमुकमधील जागा वाटपाचा तिढा सुटला, काँग्रेसला विधानसभेच्या किती जागा?
Iran vs America : भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू, व्हिडीओ जारी  
भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू
Rajya Sabha Election : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
Iran Israel Conflict : पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
Embed widget