एक्स्प्लोर
Tokyo Paralympics 2020: प्रमोद भगतची ऐतिहासिक कामगिरी, बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय

संपादित फोटो
1/7

टोकियो येथे खेळल्या जाणाऱ्या पॅरालिम्पिक खेळांमध्ये भारतासाठी आजचा दिवस अतिशय खास होता. भारतीय खेळाडूंनी आज बॅडमिंटन स्पर्धेत इतिहास रचला. भारताच्या प्रमोद भगतने टोकियो पॅरालिम्पिकच्या पुरुष एकेरी वर्ग SL 3 बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक (Gold Medal) जिंकले. (Photo : @pramod.bhagat8/IG)
2/7

जागतिक क्रमवारीतील नंबर एक असलेल्या पॅरा-शटलर प्रमोद भगतने अंतिम फेरीत डॅनियन बेथेलचा 21-14 आणि 21-17 असा पराभव केला. (Photo : @pramod.bhagat8/IG)
3/7

त्याने यापूर्वी जपानच्या डेसुके फुजीहाराविरुद्ध 21-11 आणि 21-16 असा विजय मिळवला होता जो उपांत्य फेरीत फक्त 36 मिनिटे चालला होता.(Photo : @pramod.bhagat8/IG)
4/7

बॅडमिंटन यावर्षी पॅरालिम्पिक स्पर्धेत डेब्यू करत आहे. जगातील नंबर वन खेळाडू भगत, अशा प्रकारे खेळात सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला. (Photo : @pramod.bhagat8/IG)
5/7

भुवनेश्वरचा 33 वर्षीय खेळाडू सध्या मिश्र दुहेरी एसएल 3-एसयू 5 वर्गात कांस्यपदकाच्या शर्यतीत आहे. (Photo : @pramod.bhagat8/IG)
6/7

भगत आणि त्याचा साथीदार पलक कोहली रविवारी कांस्य पदकाच्या प्लेऑफमध्ये जपानच्या डेसुके फुजीहारा आणि अकीको सुगिनो यांच्याशी लढतील.(Photo : @pramod.bhagat8/IG)
7/7

(Photo : @pramod.bhagat8/IG)
Published at : 04 Sep 2021 06:01 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
नाशिक
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
