England Vs Australia 'बॉक्सिंग डे टेस्ट' मध्ये इंग्लंडची ऑस्ट्रेलियावर मात Special Report
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे क्रिकेटच्या मैदानातले अट्टल प्रतिस्पर्धी... अगदी भारत-पाकिस्तान आहेत तसेच... या दोघांमध्ये होणाऱ्या टेस्ट सिरीजला 'अॅशेस' संबोधलं जातं... १८८२ साली इंग्लंडच्या पराभवानंतर या चषकाला हे नाव पडलं... क्रिकेटविश्वाचं या मालिकेकडे लक्ष असतंच.. त्यातच २६ डिसेंबरला मेलबर्नमध्ये होणारी कसोटी ही अधिक लक्ष वेधणारी... इयरएंडपर्यंत चालणं अपेक्षित असलेली ही मॅच दोनच दिवसांत संपलीये... त्यामुळे कसोटी क्रिकेटच्या भविष्यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झालीये...
ऑस्ट्रेलियातल्या मेलबर्नच्या ऐतिहासिक मैदानात झालेला कसोटी सामना... त्यातही इंग्लंडविरुद्ध 'अॅशेस ट्रॉफी'सारखी मानाची सिरीज... आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये मोठी परंपरा असलेली 'बॉक्सिंग डे टेस्ट'... मात्र पाच दिवसांचा हा सामना अवघ्या दोन दिवसांत संपला आणि जगभरातल्या क्रिकेटप्रेमींचा भ्रमनिरास झाला...
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव अवघ्या १५२ धावांवर आटोपला... त्यानंतर पहिला दिवस मावळण्यापूर्वीच इंग्लंडची टीमही ११० रन्स करून तंबूत गेली... दुसऱ्या दिवशीही काही वेगळं घडलं नाही.. ऑस्ट्रेलियाला अवघ्या १३२ धावांची मजल मारता आली... इंग्लंडनं १७५ रन्सचं आव्हान पार करत कसोटी जिंकली खरी... मात्र रडतखडत... कारण त्यांचेही सहा बळी तोपर्यंत गेले होते...
तसं बघितलं तर मालिकेतल्या पहिल्या तिन्ही टेस्ट ऑस्ट्रेलियानं जिंकल्यात... त्यामुळे यजमानांनी मालिका आधीच खिशात टाकलीये... तरीही हा पराभव कांगारूंचा कर्णधार स्टीव्ह स्मिथच्या जिव्हारी लागलाय... त्यानं सामना संपल्यानंतर पिच क्युअरेटरवर चांगलंच तोंडसुख घेतलंय...
मला वाटतं की बॉलर्ससाठी हे पिच तयार केलं गेलं होतं. तिथं खेळणं खरंच कठीण होतं. जेव्हा दोन दिवसांत ३६ विकेट जातात, तेव्हाच तुम्हाला समजतं की हे मुद्दाम केलं गेलंय. थोडं गवत काढलं असतं किंवा त्यावर थोडं काम केलं गेलं असतं, तर मदत झाली असती... अशा शब्दांत त्यांनी एमसीजीच्या व्यवस्थापनावर टीका केली.
स्टीव्हला एवढा राग आलाय कारण मेलबर्नची परंपरा असलेल्या 'बॉक्सिंग डे टेस्ट'मध्ये पाच वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाला पराभवाचं तोंड पाहावं लागलंय...
ख्रिसमसचा दुसरा दिवस 'बॉक्सिंग डे' मानला जातो... या दिवसापासून मेलबर्नच्या मैदानात कसोटी सामना खेळण्याची दीर्घ परंपरा आहे... ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय संघ दुसऱ्या एखाद्या मोठ्या संघाविरोधात ही कसोटी खेळतो... १९६८ साली वेस्ट इंडिजविरोधात पहिली 'बॉक्सिंग डे टेस्ट' झाली होती... मात्र खऱ्या अर्थानं १९८० पासून दरवर्षी हा कसोटी सामना खेळला जातो... क्रिकेटरसिकांमध्ये या सामन्याला विशेष महत्त्व असतं आणि एरवीपेक्षा मैदानातही प्रेक्षक अधिक गर्दी करतात... याआधी २०२० साली टीम इंडियानं बॉक्सिंग डे टेस्टमध्ये कांगारूंची शिकार केली होती...
All Shows

































