एक्स्प्लोर

Baramati : मटणासाठी लाईनमध्ये थांब म्हटल्यावर राग; 'मी मोठा अधिकारी, नाव गुगलवर शोध' म्हणत मटण दुकानदाराचे अपहरण अन् मारहाण

Baramati Crime : 'मी मोठा अधिकारी आहे, नाव गुगलवर शोध' असं म्हणत एका व्यक्तीने मटण दुकानदारासोबत वाद घातला. त्यानंतर सहकाऱ्यांच्या मदतीने दुकानदाराचे अपहरण करून त्याला मारहाण केली.

पुणे : मटण घ्यायला आलेल्या व्यक्तीला लाईनमध्ये थांब म्हटल्याचा राग आला आणि त्याने थेट मटण दुकानदाराचे अपहरण करून त्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना बारामतीमध्ये घडली. 'लाईनमध्ये थांबायला वेळ नाही, मी मोठा अधिकारी आहे' अशी मग्रुरी दाखवणाऱ्या इसमाने सहकाऱ्यांच्या मदतीने थेट मटण दुकानदाराचे (Baramati Mutton Shop Owner Kidnap) अपहरण केलं आणि त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं. या प्रकरणी एकाला बारामती पोलिसांनी अटक केली आहे.

बारामतीतील ज्ञानेश्वर भारत आटोळे हा तरुण सूर्यनगरी येथे 'जय भवानी मटन शॉप' चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. 21 डिसेंबरला मटन खरेदी करण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीने लाईनमध्ये उभे राहण्यास नकार दिला. 'गुगलवर माझं नाव शोध, मी मोठा अधिकारी आहे' अशी दमदाटी त्याने केली. त्यावेळी वाद-विवाद झाला आणि वजनाचा काटा उचलून मारण्याचा प्रयत्न झाल्यानंतर तो व्यक्ती मटन घेऊन निघून गेला.

Mutton Shop Owner Kidnap Case : मटण दुकानदाराचे अपहरण

या घटनेचा राग मनात धरून त्या व्यक्तीने बदला घेण्यासाठी ऋषी गावडे याला सुपारी दिली. त्यानंतर ऋषी गावडे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी ज्ञानेश्वर आटोळे याला 25 डिसेंबर रोजी गाठले. पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट आणि क्रेटा गाड्यांमधून आलेल्या पाच इसमांनी ज्ञानेश्वर आटोळे याला जबरदस्तीने स्विफ्ट कारमध्ये बसवले.

ज्ञानेश्वर आटोळे याच्याशी मटणाच्या दुकानावर वाद घालणारा व्यक्ती हा व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून ऋषी गावडेच्या संपर्कात होता. 'मी सांगितले तसेच करा, मला बघू द्या याच्यात किती दम आहे' असे म्हणत त्याने मारहाणीचे आदेश दिल्याचा आरोप आहे.

कन्हेरी रोड आणि जळोची ब्रिज परिसरात नेऊन आरोपींनी कोयत्याचे मुठीने, बेल्टने आणि लाथा-बुक्क्यांनी मटण दुकानदाराला मारहाण केली. 'तुला जिवंत सोडणार नाही' अशी धमकीही त्यांनी दिली. यानंतर ऋषी गावडे यानेही शिवीगाळ आणि दमदाटी केल्याचा आरोप नोंदवण्यात आला आहे.

या प्रकरणी अपहरण करून मारहाण करणे आणि इतर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी ऋषी गावडे यास पोलिसांनी अटक केली असून प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांनी त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. संकेत मुसळे, शितल बेंगारे (रा. पारवडी) हे सुद्धा गुन्ह्यात सहभागी असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं. इतर आरोपींबाबत तपास सुरू आहे.

ही बातमी वाचा:

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

संतापजनक! लोकलमध्ये बसण्यावरुन वाद, 62 वर्षाच्या दिव्यांग प्रवाशाला धावत्या गाडीतून खाली ढकललं, प्रवाशाचा मृत्यू 
संतापजनक! लोकलमध्ये बसण्यावरुन वाद, 62 वर्षाच्या दिव्यांग प्रवाशाला धावत्या गाडीतून खाली ढकललं, प्रवाशाचा मृत्यू 
Crime News : आधी पत्नीला अन् बहिणीला मारले, नंतर 'हनुमान चालीसा' ऐकून स्वतःवर गोळी झाडली; लखनऊ हत्याकांडात धक्कादायक खुलासा
आधी पत्नीला अन् बहिणीला मारले, नंतर 'हनुमान चालीसा' ऐकून स्वतःवर गोळी झाडली; लखनऊ हत्याकांडात धक्कादायक खुलासा
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
ग्राहक बनून आल्या, दीड किलो सोनं चोरुन गेल्या! छत्रपती संभीजनगरमध्ये बुरखाधारी महिलांकडून हादरवणारी चोरी
ग्राहक बनून आल्या, दीड किलो सोनं चोरुन गेल्या! छत्रपती संभीजनगरमध्ये बुरखाधारी महिलांकडून हादरवणारी चोरी

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget