एक्स्प्लोर
In Pics : चेन्नईविरुद्ध सामन्यात शिखरचा नवा विक्रम, अशी कामगिरी करणारा जगातील दुसरा फलंदाज
शिखर धवन
1/10

भारतीय क्रिकेटमधील गब्बर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhawan) याने एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
2/10

पंजाब किंग्ज विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (Punjab Kings Vs Chennai Super Kings) सामन्यात पंजाब किंग्जला प्रथम फलंदाजी करावी लागली, यावेळीच शिखरने ही कामगिरी केली.
3/10

शिखर धवन (Shikhar Dhawan) याने सुरुवातीच्या दोन धावा घेत एक नवा विक्रम रचला आहे. त्याने आयपीएलमधील 6000 धावांचा टप्पा पूर्ण केला.
4/10

विशेष म्हणजे ही कामगिरी करणारा तो जगातील दुसराच फलंदाज आहे.
5/10

या सामन्यापूर्वी शिखर धवननं आतापर्यंत आयपीएलचे 201 सामने खेळले होते. ज्यात 34. 67 च्या सरासरीनं त्यानं 5 हजार 998 धावा केल्या आहेत. यात दोन शतकं आणि 45 अर्धशतकांचा समावेश होता.
6/10

आयपीएलमध्ये तो सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराटनंतर दुसऱ्या क्रमांकावर असून विराटने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत 215 सामन्यांत 36.58 च्या सरासरीनं 6 हजार 402 धावा केल्या आहेत.
7/10

त्यानंतर रोहित शर्मा 5 हजार 764 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानं 221 सामन्यात ही कामगिरी केली आहे. दरम्यान शिखरने नुकत्याच 6 हजार धावा पूर्ण केल्या आहेत.
8/10

सामन्यात शिखरने नाबाद 88 धावा केल्या यावेळी भानुका राजपक्षाने त्याला चांगली साथ दिली.
9/10

भानुका याने दोन चौकार आणि दोन षटकार ठोकत 32 चेंडूत 42 धावा केल्या.
10/10

चेन्नईच्या गोलंदाजांनी सर्व पंजाबच्या फलंदाजांना भेदक गोलंदाजी केली असता शिखरने एकहाती झुंज दिली.
Published at : 25 Apr 2022 10:43 PM (IST)
आणखी पाहा























