Smriti Mandhana First Appearance : मला क्रिकेटपेक्षा जास्त काही आवडत नाही,स्मृती मानधना स्पष्ट बोलली
Smriti Mandhana First Appearance : मला क्रिकेटपेक्षा जास्त काही आवडत नाही,स्मृती मानधना स्पष्ट बोलली
भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना (Smriti Mandhana) संगीतकार पलाश मुच्छलसोबत (Palash Mucchal) लग्न मोडल्यानंतर पहिल्यांदाच एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर देखील उपस्थित होती. या कार्यक्रमात क्रिकेटपेक्षा जास्त काहीच आवडत नाही, असं मत स्मृती मानधनाने व्यक्त केलं. (Smriti Mandhanna And Palash Muchhal Wedding Called Off) आयुष्यात इतके चढ-उतार असूनही तु क्रिकेटवर कशी लक्ष केंद्रित करते, असा प्रश्न कार्यक्रमाच्या सूत्रसंचालक, क्रिकेट समालोचक मंदिरा बेदी यांनी स्मृती मानधनााला विचारला. यावर मला वाटत नाही की मला क्रिकेटपेक्षा जास्त काही आवडते. भारतीय जर्सी घालणे ही आमची सर्वात मोठी प्रेरणा आहे. तुम्ही तुमच्या सर्व समस्या बाजूला ठेवता आणि त्यामुळेच तुम्हाला जीवनावर लक्ष केंद्रित करण्यास मदत होते, असं उत्तर स्मृती मानधनाने दिलं.























