एक्स्प्लोर
Rohit Sharma : आयपीएलमध्ये रोहित शर्माच्या नावे नकोसा विक्रम, 'अशी' लाजिरवाणी कामगिरी
Rohit Sharma in IPL 2023, MI vs RCB : मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात फक्त सात धावा करुन बाद झाला. यासोबतच त्याच्या नावे लाजीरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे.
Rohit Sharma Record in IPL | MI vs RCB
1/12

आयपीएलच्या 54 (IPL 2023) व्या सामन्यात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) संघाचा पराभव केला.
2/12

मुंबईने बंगळुरुचा सहा विकेट्सने दणदणीत पराभव केला. मुंबईकडून सूर्यकुमार यादव, नेहाल वढेरा आणि इशान किशन यांनी चांगली खेळी केली.
3/12

सूर्यकुमारच्या 83 धावांच्या झंझावाती खेळीसह मुंबईने हा सामना जिंकला. दरम्यान, मुंबई संघाने हा सामना जिंकला असला, तरी मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्माचा डाव थोडक्यात आटोपला.
4/12

रोहित शर्मा फक्त सात धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. या खेळीसोबतच रोहितच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे.
5/12

बंगळुरु विरुद्धचा सामना जिंकल्यानंतरही मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याच्या लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे.
6/12

मुंबईकडून सलामीला उतरलेला रोहित शर्मा अवघ्या सात धावा करून बाद झाला. गेल्या काही काळापासून रोहित शर्मा खराब फॉर्ममध्ये दिसत आहे.
7/12

यंदाच्या आयपीएलमध्ये रोहित शर्माला त्याच्या नावाला साजेशी अशी खेळी करता आलेली नाही. अनेक वेळा रोहित 10 हून कमी धावा करून तंबूत परतला आहे.
8/12

गेल्या पाच सामन्यांमध्ये रोहित शर्मा एक अंकी धावसंख्येवर बाद झाला आहे. यासोबतच रोहित शर्माच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे.
9/12

आयपीएलच्या इतिहासात रोहित शर्मा त्याच्या कारकिरर्दीत पहिल्यांदा सलग पाच सामन्यांमध्ये एक अंकी धावसंख्येवर बाद झाला आहे.
10/12

त्याआधीही रोहित आयपीएल 2017 मध्ये सलग चार सामन्यांमध्ये 10 हून कमी धावसंख्येवर बाद झाला होता. आयपीएल 2023 मध्ये रोहितने स्वत:च नकोसा विक्रम मोडला आहे.
11/12

रोहित शर्मा गेल्या काही काळापासून खराब फॉर्ममध्ये आहे. रोहितच्या बॅटमधून धावा काढणं कठीण झालं आहे. आयपीएल 2023 मध्ये आतापर्यंतच्या 11 सामन्यांमध्ये रोहितनं फक्त 191 धावा केल्या आहेत.
12/12

आरसीबीविरुद्धच्या सामन्यात तो 8 चेंडूत 7 धावा करून बाद झाला. तो यंदाच्या आयपीएलच्या सलग पाच डावांमध्ये एक अंकी धावसंख्येवर बाद झाला आहे, ही त्याच्या कारकिर्दीतील पहिलीच वेळ आहे.
Published at : 10 May 2023 01:29 PM (IST)
आणखी पाहा























