Dhurandhar Hit Or Flop On Box Office: अक्षय खन्नाचा 'धुरंधर' हिट की फ्लॉप? बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे काय सांगतात?
Dhurandhar Hit Or Flop On Box Office: धुरंधर'नं 12 दिवसांत भारतीय बॉक्स ऑफिसवर 428.50 कोटी कमावले आहेत. सॅकनिल्कच्या अहवालानुसार, रणवीर सिंहचा सिनेमा जगभरातही धुमाकूळ घालतो.

Dhurandhar Hit Or Flop On Box Office: अक्षय खन्ना (Akshaye Khanna), रणवीर सिंह (Ranveer Singh) यांची नुकतीच रिलीज झालेली फिल्म 'धुरंधर'नं (Dhurandhar) बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) सध्या गाजतेय. या फिल्मनं भल्याभल्या दिग्गजांना मागे टाकलंय. प्रत्येकाच्या तोंडी फक्त 'धुरंधर'चंच नाव आहे. फिल्म बॉक्स ऑफिसवर धुवांधार कलेक्शन करतेय. 'धुरंधर' 5 डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज करण्यात आलेली आणि आता फिल्म मोठ्या पडद्यावर येऊन 13 दिवस झालेत. फिल्म वर्ल्डवाईड आता 700 कोटी क्लबपर्यंत पावलं टाकत आहे. तेच भारतात 500 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेण्याच्या जवळ आहे.
'धुरंधर'नं 12 दिवसांत भारतीय बॉक्स ऑफिसवर 428.50 कोटी कमावले आहेत. सॅकनिल्कच्या अहवालानुसार, रणवीर सिंहचा (Ranveer Singh) सिनेमा जगभरातही धुमाकूळ घालतो. आखाती देशांमध्ये प्रदर्शित न होता, चित्रपटानं 634 कोटी कमावले आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की 'धुरंधर' बॉक्स ऑफिसवर (Dhurandhar Box Office Collection) हिट होता की फ्लॉप?
View this post on Instagram
कोइमोईच्या अहवालानुसार, 'धुरंधर'चं बजेट 225 कोटी होतं. चित्रपट हिट होण्यासाठी, त्याला त्याच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या जवळपास दुप्पट कमाई करावी लागते. 'धुरंधर'नं 12 दिवसांत जगभरातील बॉक्स ऑफिसवर 634 कोटी कमावले आहेत, जे त्याच्या बजेटच्या 281.78 टक्के आहे. यासह, 'धुरंधर' बॉक्स ऑफिसवर हिट नसून ब्लॉकबस्टर ठरला आहे.
View this post on Instagram
'धुरंधर'ची स्टार कास्ट आणि सीक्वल
आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजतोय. ही एक स्पाय-थ्रीलर अॅक्शन फिल्म आहे, ज्यामध्ये रणवीर सिंह लीड रोलमध्ये आहे. तर, अक्षय खन्नानं रहमान डकैतची भूमिका साकारुन सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडलंय. याव्यतिरिक्त अर्जुन रामपाल, संजय दत्त आणि आर. माधवन यांनीही आपल्या अभिनयानं चाहत्यांना इम्प्रेस केलंय. मेकर्सनी आधीच 'धुरंधर'चा सीक्वलही अनाउंस केलं आहे. 'धुरंधर'चा सीक्वल 19 मार्च 2026 रोजी थिएटर्समध्ये रिलीज केला जाणार आहे. 'धुरंधर पार्ट 2' बॉक्स ऑफिसवर नक्कीच धमाकेदार कामगिरी करेल यात काही शंका नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
धुरंधर’ पाहून मजा नाही आली? हरकत नाही! OTTवर पाहा 2025 मधील IMDbच्या टॉप-5 वेब सिरीज























