एक्स्प्लोर
Rinku Singh: ती एक चूक महागात पडली; रिंकू सिंहला भारतीय संघात स्थान न मिळण्यास कोलकाता नाइट रायडर्स जबाबदार?
मंगळवारी जाहीर झालेल्या भारताच्या टी-20 विश्वचषक संघात रिंकूला राखीव खेळाडूंमध्ये स्थान मिळाल्याने चाहतेही नाराज झाले आहेत.
kkr rinku singh
1/7

आयपीएलमध्ये गेल्या वर्षी गुजरातविरुद्ध अखेरच्या षटकात सलग पाच षटकार ठोकत कोलकाताला थरारक विजय मिळवून दिला होता, तेव्हापासून रिंकूने भारतीय क्रिकेटचे लक्ष वेधले. त्यानंतर रिंकू सिंहला भारतीय क्रिकेटच्या टी- 20 संघातही संधी मिळाली. (Image Credit-IPL)
2/7

भारतीय संघात दाखल होताच त्याने अनेकवेळा विजय मिळवून दिले. त्यामुळे काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आयसीसी टी-20 विश्वचषकाच्या स्पर्धेत त्याला भारतीय संघाकडून संधी मिळेल अशी अनेकांना आशा होती. मात्र, मंगळवारी जाहीर झालेल्या भारताच्या टी-२० विश्वचषक संघात रिंकूला राखीव खेळाडूंमध्ये स्थान मिळाल्याने चाहतेही नाराज झाले आहेत.(Image Credit-IPL)
3/7

मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करणारा अष्टपैलू हार्दिक पांड्या अपयशी ठरूनही त्याला संघात स्थान मिळाले, तसेच भारताच्या उपकर्णधारपदाची जबाबदारीही त्याला देण्यात आली. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. अनेक माजी दिग्गज खेळाडूंनी देखील यावरुन विविध प्रतिक्रिया दिल्या. (Image Credit-IPL)
4/7

ती एक चूक महागात?- कोलकाता नाइट रायडर्स संघाने रिकूचा वापर फिनिशर म्हणून केला. रिंकूला कधीही आघाडीच्या किवा मधल्या फळीत फलंदाजी मिळाली नाही. (Image Credit-IPL)
5/7

अखेरच्या सामन्यात दिल्लीविरुद्ध रिंकू तिसऱ्या स्थानी फलंदाजीला आला खरा, मात्र त्याने केवळ 11 धावांच केल्या. रिंकू जेव्हा फलंदाजीला आला, तेव्हा त्याला फारसे चेंडू खेळण्यास मिळाले नाहीत. त्यामुळेच आक्रमक फटकेबाजीचा फटकाही त्याला बसला.(Image Credit-IPL)
6/7

हार्दिक अपयशी ठरला असला तरी...- बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हार्दिक पांड्या अपयशी ठरला असला तरी तोच भारताचा सर्वोत्तम वेगवान गोलंदाज अष्टपैलू आहे. आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाज अष्टपैलू म्हणून हार्दिक पांड्यानेच गोलंदाजी केली आहे. रिंकू सिंहला कमी संधी मिळाली, पण त्याला अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. (Image Credit-IPL)
7/7

टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा(कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज. राखीव खेळाडू- शुभमन गिल, रिंकू सिंग, आवेश खान, खलील अहमद (Image Credit-BCCI)
Published at : 02 May 2024 12:48 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























