एक्स्प्लोर
In Pics : हॉकी विश्वचषकात भारताची विजयी सुरुवात, स्पेनला 2-0 ने दिली मात
Hockey World Cup 2023: हॉकी विश्वचषकाची सुरुवात भारताने विजयाने केली असून स्पेन संघावर 2-0 असा दमदार विजय मिळवला आहे.
Hockey World Cup 2023
1/10

यंदा भारतीय भूमीत होणाऱ्या हॉकी विश्वचषकाची सुरुवात भारताने विजयाने केली आहे.
2/10

भारतीय हॉकी संघाने विश्वचषकाच्या सलामनीच्या सामन्यात स्पेनवर 2-0 ने विजय मिळवला आहे.
3/10

यंदा विश्वचषक स्पर्धा भारतात होत असताना भारताने विजयाने स्पर्धेची सुरुवात केल्याने भारतीय संघाचं कौतुक होत आहे.
4/10

सलामीच्या सामन्यात भारताच्या विजयाने भारतीय हॉकी चाहतेही सुखावले आहेत.
5/10

सामन्यात सुरुवातीपासून भारतीय संघानं आपलं वर्चस्व ठेवलं होतं.
6/10

सामन्यात भारतासाठी अमित रोहिदास आणि हार्दिक सिंग यांनी प्रत्येकी एक गोल केला.
7/10

भारतीय चाहत्यांनीही मोठ्या प्रमाणात भारताच्या सामन्याला सपोर्ट करण्यासाठी मैदानात उपस्थित दर्शवली होती.
8/10

भारत असणाऱ्या D गटात भारताने विजय मिळवत चांगली आघाडी घेतली आहे. या गटात भारतासह इंग्लंड, स्पेन आणि वेल्स असे दमदार संघ आहेत.
9/10

भारताशिवाय या गटातील इंग्लंड आणि वेल्स यांचाही आज सामना झाला ज्यात इंग्लंडने 5-0 असा दमदार विजय मिळवला.
10/10

भारताचा यानंतरचा सामना रविवारी अर्थात 15 जानेवारी रोजी इंग्लंडविरुद्ध असणार आहे. आजप्रमाणेच सायंकाळी 7 वाजता हा सामना राउरकेला येथील बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
Published at : 14 Jan 2023 07:00 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
जॅाब माझा
व्यापार-उद्योग
नवी मुंबई
























