एक्स्प्लोर
Steve Smith : स्मिथचे भारताविरुद्ध नववे कसोटी शतक, रुटची केली बरोबरी
स्मिथ याने 268 चेंडूत 121 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 19 चौकार लगावले. लॉर्ड शार्दूल ठाकूर याने स्मिथ याला बाद करत भारताला मोठं यश मिळवून दिले.
Steve Smith
1/5

IND vs AUS WTC Final 2023, Steven Smith : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टिव स्मिथ याने चिवट फलंदाजी करत भारतीय गोलंदाजांचा घामटा काढला. संयमी फलंदाजी करत स्मिथ याने शतकी खेळी केली. स्मिथने पहिल्या दिवसी 95 धावांवर नाबाद होता. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर आक्रमक रुप घेत शतकाला गवसणी घातली. स्मिथ याने 268 चेंडूत 121 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 19 चौकार लगावले. लॉर्ड शार्दूल ठाकूर याने स्मिथ याला बाद करत भारताला मोठं यश मिळवून दिले. पण त्यापूर्वी स्मिथने आपले काम पूर्ण केले.
2/5

स्टिव्ह स्मिथ याने भारताविरोधात नववे शतक झळकावत नव्या विक्रमाला गवसणी घातली. भारताविरोधात सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजात तो जो रुटसोबत पहिल्या क्रमांकावर पोहचलाय.
Published at : 08 Jun 2023 07:52 PM (IST)
आणखी पाहा























