एक्स्प्लोर
World Oldest Tortoise : जगातील सर्वात वयस्कर कासव, 190 व्या वाढदिवसाचा जल्लोष
World Oldest Tortoise Turns 190 Years : जोनाथन (Jonathan - Seychelles Giant Tortoise) हा पृथ्वीवरील सर्वात वृद्ध कासव आहे. हे कासव इतिहासाचा साक्षीदार आहे.

World Oldest Tortoise Jonathan
1/9

World Oldest Tortoise Birthday : जोनाथन (Jonathan Seychelles Giant Tortoise) हे पृथ्वीवरील सर्वात वृद्ध कासव असल्याची औपचारिक घोषणा आधीच करण्यात आली आहे. गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness World Records) या कासवाची नोंद आहे.
2/9

या कासवाचं वय 190 वर्ष आहे. हे कासव इतिहासाचा साक्षीदार आहे. हे कासव पृथ्वीवरील सर्वात वृद्ध असलेला जिवंत प्राणी आहे.
3/9

जोनाथन (Jonathan) दक्षिण अटंलांटिकमधील सेंल हेलेना येथे आपला 190 वा वाढदिवस साजरा करत आहे. याच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. नेपोलियनच्या मृत्यूनंतर या कासवाचा जन्म झाला होता.
4/9

जोनाथन या कासवाच्या जन्माबाबत स्थानिक प्रशासनाकडे कोणतेही दस्ताऐवज उपलब्ध नाहीत. जोनाथनचं वय याहून अधिक असण्याचीही शक्यता आहे.
5/9

शास्त्रज्ञांनी कासवाच्या कवचावर केलेल्या संशोधनाच्या आधारे या कासवाचा जन्म 1832 मध्ये झाला असावा. जोनाथन हे सेंट हेलेनाच्या गव्हर्नरचे अधिकृत निवासस्थान असलेल्या प्लांटेशन हाऊस येथे आरामदायी जीवन जगत आहेत.
6/9

जोनाथनसोबतच डेव्हिड, एम्मा आणि फ्रेड अशी आणखी तीन वृद्ध कासवंही येथे राहतात. 1838 मध्ये जोनाथनचा पहिला फोटो काढण्यात आल्याचे सांगितलं जातं.
7/9

सेंट हेलेना येथे जोनाथनच्या वाढदिवसानिमित्त विशेष टपाल तिकिटाच्या प्रकाशन करण्यात येणार आहे. याशिवाय इतरही अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
8/9

रविवारी जोनाथनच्या वाढदिवसानिमित्ती जंगी सेलिब्रेशन होईल. यावेळी केक कापला जाईल.
9/9

जोनाथनच्या केअर टेकरने 2017 मध्ये एएफपीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की, जोनाथनला गाजर, काकडी, सफरचंद आणि नाशपाती आवडतात.
Published at : 04 Dec 2022 10:05 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सातारा
आयपीएल
राजकारण
कोल्हापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
