Auto Rickshaw Accident video: सर्वांची फिल्डिंग सेट झाली! एकाच वेळी तीन रिक्षांची टक्कर, बाजूचा दुचाकीवाला विचारतो, "पण मी काय केलं, माझा काय दोष?"
Auto Rickshaw Accident Video: चालत्या रिक्षाचा टायर सुटून झालेला भीषण अपघात सीसीटीव्हीत कैद झाला. तीन रिक्षा एकमेकांना धडकल्या आणि दुचाकीस्वारही रस्त्यावर कोसळला. व्हिडिओ व्हायरल!

Auto Rickshaw Accident video: सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एका चालत्या रिक्षाचा अचानक टायर सुटला, ज्यामुळे ती समोरून येणाऱ्या दोन रिक्षांना धडकली, ज्यामुळे तिन्ही रिक्षा रस्त्यावर एकमेकींना धडकल्या. तीन रिक्षा धडकल्यानंतर बाजूलाच मोबाईलवर टाईमपास करत असलेल्या दुचाकीस्वाराची कारण नसताना भंबेरी उडाली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (viral CCTV footage) रेकॉर्ड झाली आहे आणि आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
धोकादायक अपघाताचा व्हायरल व्हिडिओ पहा (rickshaw collision video)
तथापि, या घटनेच्या ठिकाणाबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही. व्हिडिओमध्ये एका चालत्या रिक्षाचा अचानक टायर सुटला, ज्यामुळे तोल गेला आणि समोरून येणाऱ्या दोन रिक्षांना धडक दिली. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की सर्व रिक्षा प्रवाशांना घेऊन जात होत्या. रस्त्याच्या कडेला एक दुचाकीस्वार देखील दिसत आहे, त्याची मात्र भंबेरी उडाली रस्त्यावर कोसळला. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे तीन रिक्षा एकाच वेळी टक्कर देत असल्याचे दिसून येते, ज्यामुळे सर्वजण रस्त्यावर कोसळले.
View this post on Instagram
अपघातानंतर रस्त्यावर गर्दी जमली (rickshaw tire burst acciden)
अपघातानंतर घटनास्थळी गर्दी जमली. ये-जा करणाऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली. व्हिडिओमध्ये काही लोकांना गंभीर दुखापती झाल्याचे दिसत आहे, तर काही जण लंगडत चालले आहेत. किती लोक गंभीर जखमी झाले हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी, व्हिडिओमध्ये धडकेची तीव्रता स्पष्टपणे दिसून येते. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, असंख्य कमेंट्स आल्या.
इतर महत्वाच्या बातम्या

















