Smriti Mandhana: वर्ल्डकप सुरु असतानाच स्मृती मानधनाने इतिहास रचला, असा विक्रम करणारी पहिलीच फलंदाज
स्मृती मानधनाने महिला एकदिवसीय सामन्यांमध्ये 5 हजार धावा सुद्धा पूर्ण केल्या. ही कामगिरी करणारी ती दुसरी भारतीय आणि जगातील पाचवी खेळाडू ठरली.

Smriti Mandhana: टीम इंडियाची स्टार ओपनर स्मृती मानधना एका कॅलेंडर वर्षात महिला एकदिवसीय सामन्यांमध्ये 1 हजार धावा पूर्ण करणारी पहिली फलंदाज ठरली आहे. यापूर्वी इतर कोणत्याही महिला खेळाडूने हा पराक्रम केला नव्हता. याआधीचा सर्वोत्तम विक्रम ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधार बेलिंडा क्लार्कच्या नावावर होता, ज्यांनी 1997 मध्ये महिलांच्या एकदिवसीय सामन्यात 80.83 च्या सरासरीने 970 धावा केल्या होत्या. टीम इंडिया आज 12 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये चौथा सामना खेळत आहे. विशाखापट्टणम येथील एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्मृती मानधना आणि प्रतिका रावल यांनी या सामन्यात भारतीय संघाला दमदार सुरुवात करून दिली. दोन्ही खेळाडूंनी पॉवरप्लेमध्ये काही चांगले शॉट्स खेळले.
Smriti Mandhana in full flow 🚀
— ICC (@ICC) October 12, 2025
She becomes the first women's cricketer to cross 1️⃣0️⃣0️⃣0️⃣ ODI runs in a calendar year 👏
Watch #INDvAUS LIVE in your region, #CWC25 broadcast details here ➡️ https://t.co/7wsR28PFHI pic.twitter.com/ix0BCVi6p1
14 व्यांदा 50 पेक्षा जास्त धावांची भागीदारी
स्मृती मानधना आणि प्रतिका रावल यांनी महिलांच्या एकदिवसीय सामन्यात 14 व्यांदा 50 पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली. स्मृती आणि प्रतिका आता महिलांच्या एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक 50 पेक्षा जास्त धावांची भागीदारी करणाऱ्या दुसऱ्या भारतीय खेळाडू बनल्या आहेत. स्मृती आणि प्रतिका यांनी अंजुम चोप्रा आणि मिताली राज यांना मागे टाकले, ज्यांनी महिलांच्या एकदिवसीय सामन्यात 13 वेळा 50 पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली होती.
महिला एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक 50 पेक्षा जास्त धावांची भागीदारी (भारतीय खेळाडू)
18 - हरमनप्रीत कौर आणि मिताली राज (56 डाव)
14 - स्मृती मानधना आणि प्रतिका रावल (21 डाव)*
13 - अंजुम चोप्रा आणि मिताली राज (57 डाव)
13 - मिताली राज आणि पूनम राऊत (34डाव)
स्मृती मानधनाने महिला एकदिवसीय सामन्यांमध्ये 5 हजार धावा पूर्ण केल्या. ही कामगिरी करणारी ती दुसरी भारतीय आणि जगातील पाचवी खेळाडू ठरली. स्मृतीने फक्त 112 डावांमध्ये हा टप्पा गाठला. महिला एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वात कमी डाव आणि चेंडूंमध्ये 5000 धावा पूर्ण करणारी ती खेळाडू आहे. तिने स्टेफनी टेलर (129 डाव) आणि सुझी बेट्स (6182 चेंडू) यांचे विक्रम मोडले.
इतर महत्वाच्या बातम्या























