एक्स्प्लोर
Beed Crime: 'तुम्ही इथे का राहता?' खोक्या भोसलेच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला, ४ महिला जखमी
बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात, सतीश उर्फ खोक्या भोसले याच्या कुटुंबावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याने खळबळ उडाली आहे. 'अनेक वेळा सांगूनही तुम्ही या ठिकाणी का राहता?' असे म्हणत मध्यरात्री दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने हा हल्ला केल्याची माहिती जखमी महिलेने दिली आहे. शिरूर तहसील कार्यालयाजवळील गायरान वस्तीत ही घटना घडली. हल्लेखोरांनी दांडके, कोयते आणि कुऱ्हाडीने हल्ला चढवला, ज्यात चार महिला गंभीर जखमी झाल्या, तर एका महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. पीडित महिलांनी शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर, पोलिसांनी त्यांना बीडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले असून, तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सतीश भोसले याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून, पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत आहेत.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement
















