एक्स्प्लोर

Jalgaon : जळगावात वाळूमाफियांची मुजोरी, कारवाई करणाऱ्या तलाठ्यावर जीवघेणा हल्ला, ट्रॅक्टरखाली फेकण्याचा प्रयत्न

Jalgaon Crime News : चोपडा तालुक्यात या आधीही एका नायब तहसीलदाराव वाळू माफियांनी जीवघेणा हल्ला केला होता. आता तलाठ्यालाही ठार मारण्याचा प्रयत्न केला गेल्याने खळबळ उडाली आहे.

जळगाव : प्रशासन आणि पोलीस खात्याने कितीही कारवाई केली असली तरी जिल्ह्यातील वाळू माफियांची मुजोरी कायम असल्याचं दिसून येतंय. चोपडा तालुक्यातील बुधगाव येथे अवैध वाळू उपशावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तलाठ्याला त्याचा जीव गमवावा लागला असता. कारवाई करण्यासाठी गेलेल्या तलाठ्याला ट्रकवरून फेकून देत जीवे मारण्याचा प्रयत्न (Jalgaon Crime) झाला. त्यामुळे जळगावातील महसूल कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचं पाहायला मिळतंय.

अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी चोपडा तालुक्यातील बुधगाव येथील नदी पात्रात महसूल विभागाचे पथक गेले होते. त्यावेळी त्या ठिकाणी काही ट्रॅक्टर अवैध वाळू उपसा करत असल्याचे दिसून आले. कारवाई करताना अंधाराचा फायदा घेऊन इतर वाहने पसार झाले. मात्र एक ट्रॅक्टर पथकाच्या हाती लागला.

ट्रॅक्टरवरून खाली खेचले

हाती लागलेला ट्रॅक्टर जप्त करून तहसीलदार कार्यालयात नेण्यात येत असताना, ट्रॅक्टरवर बसलेले तलाठी जडे यांना चालक आणि मालकाने ट्रॅक्टर वरून खाली खेचले. त्या दोघांनी तलाठ्याला ट्रॅक्टरच्या चाकाखाली टाकण्याचा प्रयत्न केला.

या झटापटीत तलाठी जडे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना जोरदार मार लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणी चोपडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पळून गेलेल्या आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

आरोपींवर कडक कारवाई करणार

या कारवाईबाबत माहिती देताना चोपडाचे तहसीलदार भाऊसाहेब थोरात म्हणाले की, बुधगाव येथे मध्यरात्रीच्या सुमारास अवैध वाळू उपसा सुरू असल्याची गुप्त माहिती प्रशासनाला मिळाली. त्या माहितीच्या आधारे मंडल अधिकारी, तलाठी आणि इतर पाच कर्मचारी त्या ठिकाणी गेले. घटनास्थळी काही वाहने होती, मात्र अंधाराचा फायदा घेऊन ती पसार झाली. मंडल अधिकारी आणि तलाठ्यांच्या हाती यावेळी एक ट्रॅक्टर लागला. तो तहसीलदार कार्यालयाकडे घेऊन येत असताना त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला.

ज्या ठिकाणी घटना घडली आहे त्या ठिकाणी वाळू उपशाला कोणतीही परवानगी देण्यात आली नाही. या आधीही एका नायब तहसीलदार यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. त्यामुळे अवैध पद्धतीने वाळू उपसा करणाऱ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कडक कारवाई करणार असल्याचं तहसीलदार म्हणाले.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

तुळजापुरात प्रेमप्रकरणाच्या संशयातून दोघांना अमानुष मारहाण; एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी, 6 जणांविरुद्ध गु्न्हा दाखल
तुळजापुरात प्रेमप्रकरणाच्या संशयातून दोघांना अमानुष मारहाण; एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी, 6 जणांविरुद्ध गु्न्हा दाखल
Sahar Shaikh Aurangzeb Controversy : 'इतिहास कधीही पुसला जाऊ शकत नाही': AIMIM च्या सहर शेख वादाच्या भोवऱ्यात, औरंगजेब जयंतीच्या शुभेच्छा दिल्या अन्...., नेमकं काय आहे प्रकरण?
'इतिहास कधीही पुसला जाऊ शकत नाही': AIMIM च्या सहर शेख वादाच्या भोवऱ्यात, औरंगजेब जयंतीच्या शुभेच्छा दिल्या अन्...., नेमकं काय आहे प्रकरण?
Payal Pawar Zhambre Death Case Pune: पायल झांबरे मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट, सासू-सासऱ्यांना पोलिसांनी केली अटक, पतीला 4 दिवसांची पोलीस कोठडी, आत्तापर्यंत नेमकं काय-काय घडलं?
पायल झांबरे मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट, सासू-सासऱ्यांना पोलिसांनी केली अटक, पतीला 4 दिवसांची पोलीस कोठडी, आत्तापर्यंत नेमकं काय-काय घडलं?
Sangola Crime: सांगोल्यात भाजप पदाधिकाऱ्याची गोळ्या घालून जागीच संपवलं; शिवसेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप; राज्यात खळबळ उडवणाऱ्या प्रकरणाचा आता पोलिस उपअधीक्षकांकडून तपास
सांगोल्यात भाजप पदाधिकाऱ्याची गोळ्या घालून जागीच संपवलं; शिवसेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप; राज्यात खळबळ उडवणाऱ्या प्रकरणाचा आता पोलिस उपअधीक्षकांकडून तपास

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
Gold Silver Rate Hike : अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव, सोने आणि चांदीमध्ये तुफान तेजी,चांदी 7775 रुपयांनी महागली, जाणून घ्या IBJA चे नवे दर
अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव होताच सोने,चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या IBJA चे नवे दर
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
Ravindra Dhangekar on Gokul Election : एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
मोठी बातमी, सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा,75 टक्के अग्निवीरांना 2 वर्षांच्या अतिरिक्त सेवेनंतर संधी मिळणार, केंद्राचा मोठा निर्णय
सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा, केंद्राचा अग्निवीर योजनेत मोठा बदल, अश्विनी वैष्णव यांची माहिती
आयुक्तांचे वेतन थांबवण्याचे आदेश येताच मुंबई महापालिकेडून सर्वोच्च न्यायालयात माफी; म्हणाले, प्रशासनाला चूक लक्षात आली
आयुक्तांचे वेतन थांबवण्याचे आदेश येताच मुंबई महापालिकेडून सर्वोच्च न्यायालयात माफी; म्हणाले, प्रशासनाला चूक लक्षात आली
हीच लोक एका पराभवाने सैरभैर होऊन लोकशाहीचा मुडदा पाडत आहेत; कॅबिनेटचा निर्णय, 'गोकुळ'वरुन आव्हाडांचा संताप
हीच लोक एका पराभवाने सैरभैर होऊन लोकशाहीचा मुडदा पाडत आहेत; कॅबिनेटचा निर्णय, 'गोकुळ'वरुन आव्हाडांचा संताप
Maharashtra Goverment Cabinet Decision: वसतिगृहातील विद्यार्थ्यांनाही दुप्पट लाभ, वाहनचालकांसाठी 'अभय योजना', मंत्रिमंडळाच्या बैठकीत 12 धडाकेबाज निर्णय
वसतिगृहातील विद्यार्थ्यांनाही दुप्पट लाभ, वाहनचालकांसाठी 'अभय योजना', मंत्रिमंडळाच्या बैठकीत 12 धडाकेबाज निर्णय
Embed widget