Ashish Chanchlani Directorial Debut Ekaki Official Trailer Released: '7 मित्र... वीकेंड अन् महाराष्ट्रातलं एक सुनसान गावं...'; अंगावर काटा आणतो आशीष चंचलानीच्या 'एकाकी'चा ट्रेलर, पाहिलात?
Ashish Chanchlani Directorial Debut Ekaki Official Trailer Released: आशिषची वेब सीरिज, 'एकाकी' हॉरर कॉमेडीच्या जगात फुल्ल टू पैसा वसूल पॅकेज असेल असंच वाटतंय. या सीरिजच्या कॉमेडी आणि हादरवणाऱ्या व्हिडीओंनी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

Ashish Chanchlani Directorial Debut Ekaki Official Trailer Released: आशिष चंचलानीच्या (Ashish Chanchlani) दिग्दर्शनात पदार्पण करणाऱ्या 'एकाकी' सीरिजचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या सिनेमातून युट्यूबर, सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर असलेला आशिष चंचलानी एका नव्या प्रवासाची सुरुवात करत आहे. दिग्दर्शनात पदार्पण करणाऱ्या आशिष चंचलानीच्या 'एकाकी' (Ekaki Official Trailer) सीरिजची चर्चा सगळीकडेच रंगल्याचं पाहायला मिळालेली. सर्वात आधी पोस्टर आणि फर्स्ट लूक आणि आता बहुप्रतिक्षित ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सीरिजबाबतची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
आशिषची वेब सीरिज, 'एकाकी' हॉरर कॉमेडीच्या जगात फुल्ल टू पैसा वसूल पॅकेज असेल असंच वाटतंय. या सीरिजच्या कॉमेडी आणि हादरवणाऱ्या व्हिडीओंनी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. आशिष पुन्हा एकदा मनं जिंकतोय. तसेच, सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित होताच, खळबळ उडाली आहे.
View this post on Instagram
आशिष चंचलानी यावेळी हॉरर-कॉमेडीच्या जगात पाऊल ठेवतोय आणि हा अनुभव खरोखरच अनोखा असेल, याची खात्री आहे. 2 मिनिटं 41 सेकंदांचा ट्रेलरमध्ये हॉरर थ्रिलर, सस्पेन्स आणि कॉमेडी आहे. व्हिडीओ शेअर करताना, आशिष चंचलानीनं सीरिजच्या कथेचा सारांश शेअर केलाय. त्यानं लिहिलंय की, "मी तुम्हाला गोष्ट सांगू का? की तुम्ही स्वतः बघाल? बरं, फक्त सारांश ऐका... 7 मित्र... वीकेंडची सुट्टी... महाराष्ट्रातील एक निर्जन गाव आणि त्यांना गिळंकृत करण्यासाठी वाट पाहणारी एक अत्यंत भयावह शक्ती..."
'एकाकी' या वेब सीरिजमध्ये आशिषसोबत आकाश दोडेजा, हर्ष राणे, सिद्धांत सरफरे, रोहित साधवानी, ग्रिशिम नवानी आणि शशांक शेखर हेसुद्धा झळकणार आहेत. त्याच्या उत्कृष्ट कॉमिक टायमिंग आणि खळखळून हसवणाऱ्या पंचसाठी प्रसिद्ध असलेला आशिष चंचलानी यावेळी हॉरर कॉमेडी पडद्यावर साकारताना दिसणार आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर, लोक म्हणतायत की, ते या जॉनरसाठी एकदम उत्तम चॉईस आहे, अपल्या यूनीक स्टाईलनं ते प्रेक्षकांना सर्वोत्कृष्ट अनुभव देणार आहेत.
'एकाकी' 27 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार
ट्रेलर रिलीज करताना त्यानं या वेब सिरीजच्या रिलीज डेटची घोषणाही केली. 27 नोव्हेंबर रोजी हा शो यूट्यूबवर मोफत प्रदर्शित होणार असल्याचं वृत्त आहे. या सीरिजमध्ये तो केवळ दिग्दर्शकच नाही तर अभिनेता, लेखक आणि निर्माता देखील आहे.
पाहा ट्रेलर :
























