Rakhi Sawant Warns Abhinav Kashyap: 'तू जिथे भेटशील टकल्या, चप्पलनं मारणार...'; राखी सावंतनं सलमान खानवर आरोप करणाऱ्या दिग्गज दिग्दर्शकाला झोड झोड झोडलं
Rakhi Sawant Warns Abhinav Kashyap: राखी सावंतनं सलमान खानवर टीकेची झोड उठवणाऱ्या अभिनव कश्यपवर टीकेची झोड उठवली आहे. तसेच, तो 'पैशासाठी हे सर्व करतोय... असंही राखी सावंतनं म्हटलं आहे.

Rakhi Sawant Warns Abhinav Kashyap: 'ड्रामा क्वीन' (Drama Queen) राखी सावंत (Rakhi Sawant) आपल्या अतरंगी, चित्र-विचित्र वागण्यासाठी प्रसिद्ध आहे. तसेच, राख सावंत नेहमीच उघडपणे सलमान खानला (Salman Khan) पाठिंबा देताना दिसते. राखी अनेकदा सांगते की, सलमान माझ्यासाठी देवासारखा आहे. अशातच आता राखीनं सलमान खानवर आरोपांची राळ उठवणाऱ्या दिग्दर्शक अभिनव कश्यपवर टीका केली आहे. ज्यानं अलिकडेच तिचा भाऊ, म्हणजेच बॉलिवूडचा (Bollywood News) दबंग भाईजान सलमान खानवर अनेक गंभीर आरोप केलेले. 'दबंग'च्या दिग्दर्शकाचं नाव न घेता, राखीनं त्याला 'चप्पल' मारण्याची धमकी देखील दिली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून, अभिनव कश्यप (Abhinav Kashyap) सलमान खान आणि त्याच्या कुटुंबावर गंभीर आरोप करत आहे. याशिवाय, दिग्दर्शकानं अलिकडेच आमिर खानला 'धूर्त कोल्हा' म्हटलं आहे आणि शाहरुख खाननं (Shah Rukh Khan) भारतसोडून दुबईमध्ये स्थायिक व्हावं, असं सुचवलेलं. अशातच आता, राखी सावंतनं अभिनववर टीका केली आहे, ती म्हणाली की, तो 'पैशासाठी हे सर्व करतोय...' राखीनं असाही आरोप केलाय की, कश्यप 'दबंग'च्या सेटवर 'लड़कीबाजी' करायचा.
राखी सावंतनं हिंदी रशसोबत बोलताना सांगितलं की, "तू कुठेपण भेट टकल्या... तुला मी चप्पलनं मारणार... कोणीतरी 'दबंग' फिल्ममध्ये दिग्दर्शक म्हणून घेतलेलं त्याला... माहीत नाही कोण आहे तो... आम्ही तर नाव नाही घेणार... मी माझं तोंड खराब नाही करणार त्या टकल्याचं नाव घेऊन..."
"दबंग'च्या सेटवर 'लड़कीबाजी' करायचा..." (Rakhi Sawant On Abhinav Kashyap)
सलमान खानला सपोर्ट करताना राखी सावंत म्हणाली की, "भाई (सलमान) ला ना किस करायला आवडतं, ना किसिंग सीन द्यायला आवडतं... तो पृथ्वीवरील देव आहे. तो नेहमीच त्याच्या सहकलाकारांचा आणि महिलांचा आदर करतो...." राखी सावंत एवढ्यावरच थांबली नाही, तिनं अभिनव कश्यपवर 'दबंग'च्या सेटवर गैरवर्तनाचा आरोप करत म्हटलंय की, "त्यानं सेटवरच मुलींशी फ्लर्ट करू लागलेला..."
"सलमानला बदनाम करण्यासाठी बाहेरील शक्ती पैसे देतायत..." (Rakhi Sawant Defends Salman Khan)
राखी सावंतनं आरोप केलाय की, अभिनव कश्यपनं सलमानच्या संसाधनांचा गैरवापर करायला सुरुवात केली. म्हणूनच त्याला या प्रोजेक्टमधून काढून टाकण्यात आलं. तिनं असेही संकेत दिलेत की, अभिनव सलमानच्या एखाद्या शत्रूच्या प्रभावाखाली असावा... राखीच्या मते, हे लोक आणि बाहेरील शक्ती सलमान खानला बदनाम करण्यासाठी पैसे देत आहेत.
"मी सलमानसाठी माझी मान कापून घेईन..." (Rakhi Sawant Defends Salman Khan, Warns Abhinav Kashyap)
राखी म्हणाली, "मी सलमानसाठी माझा मान कापून घेईन... त्यानं नेहमीच संघर्ष करणाऱ्या कलाकारांना मदत केलीय आणि कृतज्ञता व्यक्त करण्याऐवजी, काही लोक लोकप्रियतेसाठी माझ्या भावाला वादात ओढतात..."
अभिनव कश्यपनं दावा केलेला की, "सलमान खान अरबाजचा द्वेष करतो..."
चित्रपट निर्माता, दिग्दर्शक अनुराग कश्यपचा भाऊ अभिनव कश्यप बऱ्याच काळापासून सलमान खान आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध अनेक दावे करत आहे. तसेच, अनेक गंभीर आरोपही करत आहे. 'बॉलिवूड ठिकाना'ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना, अभिनवनं सलमान खानला 'असुरक्षित' असल्याचं म्हटलंय आणि दावा केलाय की, बॉलिवूड सुपरस्टारनं 2010 च्या 'दबंग' चित्रपटात त्याचा भाऊ अरबाज खानचा रोल कमी केलेला. कश्यपनं असाही दावा केला की, सेटवर दोन्ही भावांमध्ये जोरदार वाद झालेला आणि सलमान प्रत्यक्षात अरबाजचा 'द्वेष' करतो.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























