Vasai Car Accident: समुद्रकिनाऱ्यावर आलिशान कारचा भीषण अपघात; चौथरा तोडून कार थेट खाली कोसळली
Vasai Car Accident: वसईच्या राजोडी समुद्रकिनाऱ्यावर भरधाव मर्सिडीज कारचा भीषण अपघात झालाय. भरधाव वेगात असलेली मर्सिडीज कार चौथरा तोडून थेट खाली कोसळली.

Vasai Car Accident: वसईच्या राजोडी समुद्रकिनाऱ्यावर (Vasai Rajodi Beach) रविवारी रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघाताने (Car Accident) परिसरात खळबळ उडाली आहे. भरधाव वेगात असलेली मर्सिडीज कार (Mercedes car) चौथरा तोडून थेट खाली कोसळल्याचा हा प्रकार आहे. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली तरी, या घटनेमुळे वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष आणि समुद्रकिनाऱ्यावर सुरू असलेल्या बेदरकार वाहनचालकतेचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे.
Vasai Car Accident: भरधाव कारचा भीषण अपघात
मर्सिडीज कारचा क्रमांक MH01 BK 2107 असा असून, ही गाडी मयूर जाधव यांच्या नावावर असल्याचे वाहन अॅपमधून समोर आले आहे. या वाहनाचा वेग इतका प्रचंड होता की, किनाऱ्याजवळ उभारलेला काँक्रीटचा चौथरा कारने तोडला आणि कार थेट खाली उलटली. अपघातानंतर ही कार क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आली. मात्र, गाडी कोण चालवत होते, कोणी जखमी झाले का? याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही.
Vasai Car Accident: पोलीस ठाण्यात अद्याप गुन्हा नोंद नाही
या प्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. मात्र या अपघातामुळे वसई-विरार महानगरपालिकेच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रशासनाने याबाबत योग्य ती नोंद घेण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
Vasai Car Accident: राजोडी किनाऱ्यावर हुल्लडबाजीचा वाढता प्रकार
वसई पश्चिम भागातील राजोडी समुद्रकिनारा हे परिसरातील एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. विकेंडला येथे मोठ्या संख्येने पर्यटक गर्दी करतात. मात्र, काही पर्यटकांकडून मद्यपान करून हुल्लडबाजी, भरधाव वाहनचालकता आणि स्टंटबाजीचे प्रकार नियमितपणे घडत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या बेफिकीर वर्तनामुळे अनेकदा गाड्या समुद्रात अडकणे, किनाऱ्यावर अपघात होणे अशा घटना घडत असतात.
Vasai Car Accident: पर्यटकांकडून संताप व्यक्त
रविवारी झालेल्या या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये कार बॅरिगेट तोडून थेट खाली कोसळताना दिसत आहे. प्राथमिक माहितीनुसार, वाहनचालक किरकोळ जखमी झाला आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि पर्यटकांनी बेदरकार वाहनचालकांवर कठोर कारवाई करावी,” अशी मागणी केली आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा Video
इतर महत्त्वाच्या बातम्या
अतिवृष्टीचे अनुदान मिळाले नाही, शेतकऱ्याने तहसिलदारांची गाडीच फोडली; अधिकाऱ्यांनी केला खुलासा
Nashik Crime: नाशिकच्या कारागृहात खळबळजनक घटना! कैद्याने कारागृहातच संपवलं जीवन; नेमकं काय घडलं?























