एक्स्प्लोर
Ladki Bahin Scheme RTI : 'बहिणींची संख्या कमी करण्याऐवजी भ्रष्टाचार थांबवा', RTI कार्यकर्ते Jitendra Ghadge यांचा सरकारला सल्ला
मुख्यमंत्री 'माझी लाडकी बहीण' योजनेवर (Majhi Ladki Bahin Yojana) आरटीआय कार्यकर्ते जितेंद्र घाडगे (Jitendra Ghadge) यांनी उघड केलेल्या माहितीमुळे खळबळ उडाली आहे. 'बहिणींची संख्या कमी करण्याच्या ऐवजी सरकारने भ्रष्टाचारावर नियंत्रण आणलं आणि जो पैसा लिकेज होतोय तो जर कंट्रोलमध्ये आणला तर नक्कीच ही स्कीम चालू ठेवता येईल', असे परखड मत घाडगे यांनी व्यक्त केले आहे. आरटीआयमधून समोर आलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने या योजनेवर जुलै २०२४ ते जून २०२५ या एका वर्षात तब्बल ४३,०४५ कोटी रुपये खर्च केले आहेत. एप्रिल २०२५ मध्ये योजनेचे सर्वाधिक २.४७ कोटी लाभार्थी होते, मात्र जून २०२५ पर्यंत ही संख्या सुमारे ९ टक्क्यांनी घटली. निकषांच्या आधारे सुमारे अडीच लाख महिलांना वगळल्याने सरकारची ३४० कोटी रुपयांची बचत झाली असली तरी, २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी मंजूर असलेला ३६,००० कोटी रुपयांचा निधी अपुरा पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची संख्या आणखी कमी न केल्यास सरकारच्या तिजोरीवर मोठा ताण येण्याची चिन्हे आहेत.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
















