एक्स्प्लोर
Share Market : शेअर बाजारात तेजीचा ट्रेंड कायम, 28 ऑक्टोबरला बाजारात कसं चित्र असणार?
Share Market : भारतीय शेअर बाजारात 27 ऑक्टोबरला एसबीआय लाईफ इन्शुरन्स, भारती एअरटेल, रिलायन्स इंडस्ट्रीज, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली.
शेअर बाजार अपडेट
1/6

भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये तेजी पाहायला मिळाली. निफ्टी निर्देशांक 25950 अंकांवर पोहोचला. तर, सेन्सेक्स 566.96 अंकांच्या तेजीसह 84778.84 वर बंद झाला. तर, निफ्टीमध्ये 170.9 अंकांची तेजी पाहायला मिळाली. कामकाज संपलं तेव्हा निफ्टी 25966.05 अंकांवर बंद झाला.
2/6

भारतीय शेअर बाजारात 1925 शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. तर, 1994 शेअरमध्ये घसरण झाली. 155 शेअरमध्ये कोणताही बदल झाला नाही. बीएसई मिडकॅप निर्देशांक आणि स्मॉलकॅप निर्देशांकात तेजी पाहायला मिळाली.
3/6

सोमवारी (27 ऑक्टोबरला) एसबीआय लाईफ इन्श्युरन्स, भारती एअरटेल, रिलायन्स इंडस्ट्रीज, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इटरनलच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. तर, भारत इलेक्ट्रॉनिक्स, कोटक महिंद्रा बँक, इन्फोसिस, अदानी पोर्टस, बजाज फायनान्सच्या स्टॉकमध्ये घसरण झाली. मिडिया आणि फार्मा क्षेत्रातील निर्देशांक वगळता इतर निर्देशांकामध्ये तेजी दिसून आली.
4/6

जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या आनंद जेम्स यांच्या मते निफ्टी सुरुवातीच्या तेजीत 25940 ते 26000 च्या स्तरापर्यंत पोहोचू शकली नाही तर 25590 ते 25400 पर्यंत घसरु शकते.
5/6

जिओजित फायनान्शिअलच्या के.वी.के विजयकुमार यांनी ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून सुरु असलेल्या एफआयआयच्या विक्रीतील घसरण सुरु असल्याचं म्हटलं. ऑक्टोबरच्या काही दिवसांमध्ये एफआयआय खरेदीदार राहिले. एफआयआयची विक्री 3363 कोटी रुपयांवर राहिली. जगातिक बाजारातील स्थिती, मूल्यांकनातील फरक कमी होणे,कंपन्यांची कामगिरी सुधारणे, भारत -अमेरिका व्यापार कराराची शक्यता यामुळं चांगले संकेत मिळत आहेत.
6/6

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 27 Oct 2025 11:35 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
विश्व
























