Mumbai Pune Mumbai 4: 15 वर्षांनंतर पुन्हा घडणार 'मुंबई-पुणे-मुंबई' प्रवास; चौथ्या भागाची घोषणा, गौरी-गौतमची लव्हवाली केमिस्ट्री पाहण्याची उत्सुकता
Mumbai Pune Mumbai 4: मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी यांच्या धम्माल केमिस्ट्रीनं रंगलेल्या या सिनेमाच्या चौथ्या भागाची घोषणा करण्यात आली आहे.

Mumbai Pune Mumbai 4: मराठीतला फ्रेंचायझी सिनेमा (Franchise Movies in Marathi) 'मुंबई पुणे मुंबई'चे (Mumbai Pune Mumbai) आतापर्यंत 3 पार्ट आलेत आणि तिन्ही प्रेक्षकांच्या कसोटीवर खरे उतरलेत. अशातच गेल्या बऱ्याच दिवसांपासून गाजलेल्या मराठी चित्रपटांपैकी एक असलेल्या 'मुंबई पुणे मुंबई'चा चौथा पार्ट कधी येणार? (Mumbai Pune Mumbai 4) अशा चर्चा रंगलेल्या. मुक्ता बर्वे (Mukta Barve) आणि स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) यांच्या धम्माल केमिस्ट्रीनं रंगलेल्या या सिनेमाच्या चौथ्या भागाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे तब्बल 15 वर्षांनंतर 'मुंबई-पुणे-मुंबई' प्रवास प्रेक्षकांना पुन्हा घडणार असून गौरी-गौतमची लव्हवाली केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे.
एक व्हिडीओ शेअर करुन 'मुंबई पुणे मुंबई 4'ची घोषणा करण्यात आली आहे. लवकरच 'मुंबई पुणे मुंबई' चा चौथा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये 'मुंबई पुणे मुंबई' च्या पहिल्या तीन भागांची छोटी झलक पाहायला मिळतेय. शेवटी 'मुंबई पुणे मुंबई 4 'ची (Mumbai Pune Mumbai 4 ) घोषणा करण्यात आली आहे. या व्हिडीओवर प्रेक्षकांनी खूप कमेंट्स केल्या आहेत. प्रेक्षक 'मुंबई पुणे मुंबई 4' आणि स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे एकत्र पाहायला उत्सुक आहेत.
व्हिडीओमध्ये काय दिसतंय?
व्हिडीओमध्ये दिसतंय की, 15 वर्षांपूर्वी सुरू झाला एक रोमँटिक प्रवास... 'मुंबई पुणे मुंबई', 'मुंबई पुणे मुंबई 2', 'मुंबई पुणे मुंबई 3' अशी सिनेमांची नावं लिहिलीत. पुढे लिहिलंय की, 'ती सध्या काय करते', 'प्रेमाची गोष्ट', 'ऑटोग्राफ', मुंबई पुणे मुंबईचा दिग्दर्शक परत घेऊन येतोय, तुमची आवडती सुपरहिट जोडी... नात्यांचा गोडवा वाढवायला, स्वप्नील जोशी, मुक्ता बर्वे, 'मुंबई पुणे मुंबई 4', असं या व्हिडीओत लिहिलेलं दिसतंय.
View this post on Instagram
व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनही देण्यात आलंय. त्या कॅप्शनमध्ये लिहीलंय की, "मराठीतील पहिला फ्रेंचायझी चित्रपट... आता त्याचा चौथा भाग येतोय... 'मुंबई पुणे मुंबई 4'... 'प्रेमाची गोष्ट 2' चित्रपटासोबत याचा ट्रेलर दाखवत आहेत... तर सिनेमागृहात जाऊन 'प्रेमाची गोष्ट 2' हा चित्रपट आणि 'मुंबई पुणे मुंबई 4' चा ट्रेलर नक्की पहा..."
दरम्यान, 'मुंबई पुणे मुंबई 4' चित्रपटाचं दिग्दर्शन सतिश राजवाडे यांचं आहे. तर चित्रपटाची निर्मिती संजय छाब्रिया आणि अमित भानुशाली करणार आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























