एक्स्प्लोर
PHOTO: सातासमुद्रापार बाप्पाचा उत्सव; अॅडलेडमध्ये 'ऑस्ट्रेलियाचा राजा'चे जोरदार स्वागत
सध्या गणेश उत्सवाची देशभरात धूम आहे. बाप्पाचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे.हा गणरायाचा उत्सव सातासमुद्रापार देखील साजरा केला जात आहे.
Ganesh Utsav 2022
1/10

सध्या गणेश उत्सवाची देशभरात धूम आहे. बाप्पाचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे.
2/10

हा गणरायाचा उत्सव सातासमुद्रापार देखील साजरा केला जात आहे.
3/10

युनायटेड इंडियन्स ऑफ साऊथ ऑस्ट्रेलिया या अॅडलेडस्थित शहरमध्ये 'ऑस्ट्रेलियाचा राजा' नावाने प्रचलित गणेश उत्सव साजरा होत आहे.
4/10

हा उत्सव हा 2016 पासून साजरा होत असून या वर्षी लालबाग मुंबई येथे बनवलेली 21 फूट उंच गणेश मूर्ती 45 दिवसांचा बोटीचा प्रवास करून अॅडलेडला पोहोचली.
5/10

आज 3 आणि उद्या 4 सप्टेंबर रोजी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत.
6/10

संपूर्ण ऑस्ट्रेलियामधून जवळजवळ 15ते 20 हजार नागरिक येथे भेट देतात असे भारतीय प्रतिनिधी राजेंद्र झेंडे ह्यांनी सांगितले.
7/10

भारतातील 10 ते 15 वेगवेगळ्या राज्यातील नागरिक तिथं स्थायिक आहेत.
8/10

ते 16 तासांपेक्षा जास्त वेळ कलेचे सादरीकरण करणार आहेत.
9/10

युनायटेड इडियन्स ऑफ साऊथ ऑस्ट्रेलिया अॅडलेड स्थित कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष दिलीप कुलकर्णी, उपाध्यक्ष राकेश गुप्ता, सचिव मिहिर शिंदे, जनसंपर्क अधिकारी सदानंद मोरे, ग्रांट ऑफिसर कपिल चौसालकर आणि खजिनदार प्रशांत जगदाळे हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी झटत आहे.
10/10

ऑस्ट्रेलियाचे अनेक खासदार, सिनेट मेंबर्स आणि सांस्कृतिक मंत्री यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे.
Published at : 03 Sep 2022 02:14 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement


















