Narendra Bhondekar Bhandara : पत्नीचा पराभव, आमदार भोंडेकरांनी मागितली भंडाराकरांची माफी
Narendra Bhondekar Bhandara : पत्नीचा पराभव, आमदार भोंडेकरांनी मागितली भंडाराकरांची माफी
भंडारा शहरात अर्धवट राहिलेले भूमिगत गटार लाईनची कामं....रस्त्यांवर दिसत असलेले खड्डे...त्यामुळे शिंदे शिवसेनेच्या आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी विकास निधी खेचून आणल्यानंतरही शिवसेनेच्या उमेदवारांना नगर पालिका निवडणुकीत बसलेला फटका, यासंदर्भात शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दिलगिरी व्यक्त करत भंडाराकरांची माफी मागितली आहे. नरेंद्र भोंडेकर यांची पत्नी डॉ अश्विनी भोंडेकर या निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या उमेदवार होत्या. त्या स्वतः पराभूत झाल्यात...35 नगरसेवक असलेल्या भंडारा नगरपालिकेत शिवसेनेचे केवळ 5 नगरसेवक निवडून आलेत. मित्रपक्ष असलेल्या भाजपचे नगराध्यक्षपदासह 25 नगरसेवक निवडून आलेत आणि भंडारा नगरपालिकेवर पूर्ण बहुमतानं सत्ता काबीज केली. आम्ही विकास कामं सुरू केलेत आणि ते विकास कामं सुरू असताना नागरिकांना, मतदारांना जो त्रास झाला त्यामुळं आम्हाला फटका बसला, अशी कबुली तर दिलीचं मात्र, विकास कामं सुरू करून आमचं चुकलं की काय, अशी भावनाही शिंदे शिवसेनेचे भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी पत्रकार परिषदेतून व्यक्त केली.




















