Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
महापालिका निवडणुकाच्या (Election) पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरुन झालेल्या वादातून मनसेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोलापुरात (Solapur) घडली होती. या हत्येप्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविका आणि प्रभाग 2 च्या उमेदवारासह 15 जणावर गुन्ह्यांची नोंद करण्यात आला असून 5 जणांना अटकही करण्यात आली आहे. बाळासाहेब सरवदे यांच्या पार्थिवावर काल अंत्यसंस्कार करण्यात आले, मोठ्या पोलीस बंदोबस्तात त्यांची अंत्ययात्रा निघाली होती. त्यामुळे, या घटनेनंतर सोलापुरात तणाव निर्माण झाला असून विविध राजकीय पक्षाचे नेते पुढे येऊन भूमिका मांडत आहेत. मनसे नते अमित ठाकरे (Amit thackeray) यांनी आज सोलापुरात येऊन सरवदे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी, बाळासाहेब सरवदेंच्या कुटुंबीयांचा आक्रोश गहिवरुन टाकणारा होता.
मृत बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी अमित ठाकरे घरी पोहोल्यानंर त्यांनी माध्यमांशीही संवाद साधला. तुमचं राजकारण काहीही असो, तुमचे बिनविरोध निवडून येवो पण राजकारणासाठी कोणाचा जीवा जाता कामा नये. मी यासंदर्भात मुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे, असे अमित ठाकरेंनी म्हटले. तर, सरवदे कुटुंबीयांना भेट देत त्यांनी सांत्वन केलं. यावेळी, ‘माझे पप्पा मला आणून द्या, माझ्या पप्पाला मी भेटलेच नाही’, असा टाहो बाळासाहेब यांच्या चिमुकल्यांनी अमित ठाकरेंसमोर फोडला. सोलापुरात राजकीय वादातून हत्या झालेल्या बाळासाहेब सरवदे यांच्या चिमुकल्यांनी आणि कुटुंबीयांनी अमित ठाकरे यांच्यासमोर आक्रोश व्यक्त केला. त्यावेळी, अमित ठाकरेंनाही गहिवरुन आलं होतं.























