एक्स्प्लोर

अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं

देवाभाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, असे म्हणत भाजप नेते तथा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जोरदार टीका केली.

पुणे : राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये (Election) आता सत्तेत एकत्र असलेले पक्षही आमने-सामने आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यात, पुणे आणि पिपंरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकांवरुन भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये सध्या जोरदार कलगीतुरा रंगला आहे. पिंपरी-चिंचवड आणि पुणे (Pune) महापालिकेत अजित पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा थेट सामना रंगतोय. त्यामुळे आरोपांना चांगलीच धार आली आहे. अजित पवारांनी भाजपचा भ्रष्टाचारी असा उल्लेख केल्यानं संतापलेल्या भाजपनं अजित पवारांवर तोफ डागली. अजितदादा, दमानं घेऊ नका आणि हलक्यात घेऊ नका. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आमच्याकडे आहे हे विसरू नका असा थेट इशारा भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांनी दिला होता. आता, पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांवर टीका केली.

देवाभाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, असे म्हणत भाजप नेते तथा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जोरदार टीका केली. पुण्यातील महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने आयोजित प्रचारसभेत बोलताना पाटील यांनी अजित पवारांच्या कार्यकाळात पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये काय विकास झाला, असा सवाल उपस्थित केला. तसेच, पुणे मेट्रो आणि उड्डाण पूल हे आमच्या काळात झाले. नगरपालिका निवडणुकीत आपण विजय मिळवला, आता 15 तारखेला मतदान कर पुण्यात भाजपचा महापौर होणार आहे, असेही पाटील यांनी म्हटले.

अजितदादा म्हणाले की, पिंपरी आणि पुण्यामध्ये विकास झाला नाही, मग अजित दादा अगोदर सत्ता तुमची होती, तेव्हा विकास का केला नाही. आता, महाविकास आघाडी विकास करायला पुढे आली आहे, असा खोचक टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला. अजित पवार अनेक वर्ष सत्तेत असताना आम्हाला प्रश्न विचारतात, पाच वर्षात तुम्ही काय केले? त्यांना अनेक कामा्या यादी सांगता येतील, अजित दादा जनता खुळी नाही. उड्डाणपूल आणि मेट्रो करायला अजित दादा उशीर का झाला? मेट्रो आम्ही आणली, तुमची नुसती कागदावर राहिली. पुण्यात तुम्ही 2001 पासून 2017 पर्यंत मेट्रो करू शकला नाही. तुम्ही आम्हाला विचारता काय केलं? मात्र आता जनता तुम्हाला विचारणार आहे, तुम्ही काय केलं? असा सवाल उपस्थित करत चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांना लक्ष्य केलं.

मुख्यमंत्री फडणवीसांची पुण्याच्या 'विकास की बात'

पुण्यात पर्यटक वाढतील, पुणे शहर सेंटर झाले आहे. पुणेकर दोन महापालिकेचं पाणी एकटे वापरतात असे बोलले जायचे. कारण, पाणी वाटण्यात विषमता होती. पण, आता महापालिकेचा निर्णय झाला असून 24 बाय 7 पाणी योजना सुरू केली आहे, लवकरच ती पूर्ण झाल्यावर समान पाणीपुरवठा होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

पुण्यात तीन हजार कोटी रुपया काम 24 बाय 7 तासांमधून सुरू आहेत, जायका प्रकल्प सुरू आहे 2 हजार कोटी रुपयाचे. काय केलं सांगणार नाही, तर काय करणार हे सांगणार आहे. देशातील पहिले व्हायब्रंट शहर पुण्याला करणार आहे, मेट्रो शहर करणार आहे. 2030 पुण्याचा कॅपिटल प्ल तयार केला आहे, 44 हजार कोटी रुपये खर्च करणार असून वाहतूक आणि इतर व्यवस्थेसाठी हा पैसा खर्च केला जाईल. तो प्लॅन लवकर आपल्यासमोर मांडू, असे पुणेकरांना उद्देशून देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

पुणे ग्रोथ हब तयार करू, पुण्याची ग्रोथ चार पटीने वाढली पाहिजे अस आमचा मानस आहे. येथे रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात केली जाणार आहे. येथील वाहतूक कासवगतीने पुढे जात आहे, सर्वात कमी रस्ते आहेत, 9 टक्के रस्ते आहेत, शहरात रस्ते वाढले पाहिजे. रस्ते नियोजन कोणी केले, ज्यांनी नियोजन केले त्यात मी जात नाही, राजकारणात मी जात नाही, 32 टक्के वाहतूक आहे, जास्त वाहतूक आहे. राज्यात सर्वात कमी गतीने वाहतूक पुण्यात चालते, असेही फडणवीसांनी सांगितले.

मेट्रो जाळ, इलेक्ट्रिक बसेस, 32 रस्ते केले जाणार आहेत, एआयचा वापर करून आपण वाहतूक व्यवस्थित सुधार करणार आहोत, 13 उड्डाणपूल केले जाणार आहेत. पुण्याचा प्रोब्लेम आहे तो म्हणजे उत्तर-दक्षिण पुणे कमी आहे. आता, पुण्याला नव्याने जागा नाही घेऊ शकत. पुणे वाहतूक व्यवस्थित करण्यासाठी पाताळात जाण्याचा निर्णय घेतला आहे, 54 किलोमीटर टनेल करणार आहोत, पहिला मार्ग कात्रजपासून सुरू करणार आहोत, असेही फडणवीसांनी सांगितले. मी हवेत बोलत नाही, माझ्याकडे सगळे प्लॅन तयार आहेत, रिंगचं रोड काम सुरू केल आहे, अशी माहितीही मुख्यमंत्र्‍यांनी दिली.

हेही वाचा

आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis on Nashik potholes: 'असं रिलॅक्स राहून चालणार नाही, महाकुंभ तोंडावर'; नाशिकमधील खड्ड्यांवरुन देवेंद्र फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं
'असं रिलॅक्स राहून चालणार नाही, महाकुंभ तोंडावर'; नाशिकमधील खड्ड्यांवरुन देवेंद्र फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
Prashant Kishor and Sunil Tatkare: प्रशांत किशोरांनी सुनील तटकरेंबाबत थेट नाराजी व्यक्त करताच जय पवारांनी फक्त एकच प्रश्न विचारला, म्हणाले...
प्रशांत किशोरांनी सुनील तटकरेंबाबत नाराजी व्यक्त करताच जय पवारांनी फक्त एकच प्रश्न विचारला, म्हणाले...
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
Chanakya Niti: तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
Embed widget