एक्स्प्लोर
Dolphin : डॉल्फिन मासा एक डोळा उघडा ठेवून झोपतो, यामागचं रंजक कारण वाचा
Dolphin Interesting Fact : डॉल्फिन (Dolphin) मासा मानवाचा खूप चांगला मित्र मानला जातो. पण तुम्हाला हे माहित आहे की, डॉल्फिन मासा एक डोळा उघडा ठेवून झोपतो.
Dolphin Sleeps with One Eye Open (PC : istockphoto)
1/12

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, डॉल्फिन मासे पाण्याखाली श्वास घेऊ शकत नाहीत. डॉल्फिन मासा असूनही तो पूर्ण वेळ पाण्याखाली राहू शकत नाही. (PC :istockphoto)
2/12

डॉल्फिन मासा पाण्याखाली श्वास घेऊ शकत नाही, म्हणूनच तो 2 ते 3 मिनिटांनी पाण्याच्या पृष्ठभागावर येतो आणि श्वास घेतो. (PC :istockphoto)
3/12

कधीकधी डॉल्फिन मासा 5 ते 7 मिनिटे श्वास रोखू शकते आणि पाण्यात राहू शकतात. (PC :istockphoto)
4/12

डॉल्फिन जेव्हा झोपतात तेव्हा फक्त एक डोळा बंद करतात. जेव्हा मेंदूचा उजवा अर्धा भाग झोपतो तेव्हा डावा डोळा बंद होतो. याउलट मेंदूचा जेव्हा मेंदूचा डावा अर्धा भाग झोपतो तेव्हा उजवा डोळा बंद होतो. (PC :istockphoto)
5/12

या झोपेला 'युनिहेमिस्फेरिक स्लीप' (Unihemispheric sleep) असे म्हणतात. झोपेत असताना श्वासोच्छवास चालू ठेवण्यासाठी, अनेक जलचर सस्तन प्राणी ज्याला युनिहेमिस्फेरिक स्लीपचा वापर करतात. (PC :istockphoto)
6/12

युनिहेमिस्फेरिक स्लीप म्हणजेच झोपताना त्यांचा अर्धा मेंदू कार्य करतो. (PC :istockphoto)
7/12

युनिहेमिस्फेरिक स्लीपमध्ये मेंदूचा फक्त अर्धा भाग एका वेळी विश्रांती घेतो. त्यावेळी दुसरा अर्धा भाग काम करतो म्हणून डॉल्फिन एक डोळा उघडे ठेवून झोपतात. (PC :istockphoto)
8/12

समुद्राबरोबरच भारतातील पवित्र गंगा नदीतही डॉल्फिन आढळतात. पण, गंगा नदीत आढळणाऱ्या डॉल्फिन माशांची संख्या पूर्वीपेक्षा खूपच कमी झाली आहे. (PC :istockphoto)
9/12

मात्र आता भारत सरकार डॉल्फिन माशांना वाचवण्यासाठी मोहीम राबवत असून त्याच्या शिकारीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. (PC :istockphoto)
10/12

मांसासाठी आणि मांसापासून बनवलेल्या तेलासाठी नेहमीच डॉल्फिन माशांची शिकार केली जाते. या तेलाला बाजारात मोठी मागणी आहे. (PC :istockphoto)
11/12

डॉल्फिन माशांच्या मांसापासून बनवलेल्या तेलाला बाजारात मोठी मागणी असून हे तेल चढ्या दराने विकले जाते. (PC :istockphoto)
12/12

यामुळेच जगभरात डॉल्फिन माशांची मोठ्या प्रमाणात शिकार झाली. पण, आता अनेक सरकारी आणि निमसरकारी संस्थांनी डॉल्फिन माशांना वाचवण्यासाठी मोहिम हाती घेतली आहे. (PC :istockphoto)
Published at : 02 Jan 2023 01:29 PM (IST)
आणखी पाहा























