एक्स्प्लोर
काँग्रेस माफी मांगो, अशोक चव्हाणांचा फोटो शेअर करत आमदार जितेंद्र आव्हाडांकडून टोला
भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेतील भाषणावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेत केलेल्या वक्तव्यावरुन देशभर निषेध व्यक्त केला जात आहे.

Jitendra Awhad share photo of Ashok chavan
1/7

भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेतील भाषणावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेत केलेल्या वक्तव्यावरुन देशभर निषेध व्यक्त केला जात आहे.
2/7

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेणं हे फॅशन झालीय, एवढं नाव देवाचं घेतलं असतं तर स्वर्ग मिळाला असता, असं अमित शाह यांनी म्हटलं होतं. त्यावरुन, विरोधी पक्षातील नेत्यांनी संसद परिसरातही आंदोलन सुरू केलं आहे.
3/7

अमित शाह यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली, तसेच काँग्रेसनेच बाबासाहेबांचा अपमान केल्याचे सांगत माझ्या वक्तव्याला मोडून-तोडून दाखवलं जात असल्याचंही ते म्हणाले.
4/7

दरम्यान, काँग्रेसकडून दिल्लीसह विविध राज्यात या मुद्द्यावरुन आंदोलन सुरू करण्यात आलं. काँग्रेसच्या या आंदोलनाला उत्तर म्हणून भाजपनेही आंदोलन सुरू केलं आहे.
5/7

काँग्रेसनेच डॉ. बाबासाहेबांचा दोनवेळा पराभव केला, काँग्रेसनेच बाबासाहेबांचा अपमान केल्याचा दाखला भाजपकडून दिला जात आहे.
6/7

दरम्यान, या आंदोलनातील खासदार अशोक चव्हाण यांचा एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. त्यावरुन आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अशोक चव्हाण यांना चिमटा काढला आहे.
7/7

कधीकाळी काँग्रेसकडून मुख्यमंत्री राहिलेल्या अशोक चव्हाण यांच्या हातात काँग्रेस माफी मांगो हा बॅनर झळकत आहे. त्यावरुन, आव्हाड यांनी शंकररावजी, अशोकरावजींना माफ करा, असा उपरोधात्मक टोला लगावला आहे.
Published at : 20 Dec 2024 09:47 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
क्राईम
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion