एक्स्प्लोर
PHOTO : कारखान्यांमधील सांडपाण्यामुळे अंबरनाथच्या वालधुनी नदीवर प्रदूषणाचा फेस
अंबरनाथच्या वालधुनी नदीत आज सकाळी प्रदूषणाचा फेस जमा झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्यामुळे स्थानिकांनी संताप व्यक्त केला.
Ambarnath Valdhuni River Pollution
1/9

अंबरनाथ शहरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीवर प्रदूषणाचा फेस जमा झाल्याचं चित्र आज पाहायला मिळालं.
2/9

अंबरनाथ एमआयडीसीतील रासायनिक कारखान्यांमधून या नदीत रासायनिक सांडपाणी सोडलं जातं.
3/9

त्यामुळेच या नदीत हे रासायनिक प्रदूषण होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
4/9

अंबरनाथ शहरातून वाहणाऱ्या बाजूनी नदीत अनेक वर्षांपासून रासायनिक कारखान्यांकडून सांडपाणी सोडलं जातं.
5/9

या सांडपाण्यामुळे वालधुनी नदीचा रासायनिक नाला झाला असून याचा स्थानिकांना मोठा त्रास होतो.
6/9

आज सकाळी वालधुनी नदीत प्रदूषणाचा फेस जमा झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्यामुळे स्थानिकांनी संताप व्यक्त केला.
7/9

वालधुनी नदीत आजवर झालेल्या प्रदूषणानंतर दरवेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून एमआयडीसीतील रासायनिक कारखान्यांची पाहणी केली जाते.
8/9

त्यानंतर कारखान्यांना नोटिसा बजावल्या जातात. मात्र यानंतर पुन्हा एकदा कंपन्यांकडून राजरोसपणे नदीत रासायनिक सांडपाणी सोडलं जातं.
9/9

त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या एकंदरीत कार्यक्षमतेवरच नव्हे, तर विश्वासार्हतेवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
Published at : 21 Dec 2022 04:38 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
व्यापार-उद्योग
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
