वोक्सवॅगन टी-रॉक (Volkswagen T-Roc) बिल्ड क्वालिटी आणि ड्राईव्हींग अनुभवांच्या बाबतीत या कारनं सर्वच अपेक्षा पूर्ण केल्या. या कारच्या मोजक्या मॉडेल्सचीही भारतात झालेली विक्रीच कारच्या लोकप्रियतेबाबत सर्वकाही सांगून जाते.
2/10
महिंद्रा थार (Mahindra Thar) एखादा बॉलिवूड कलाकार ज्याप्रमाणं चर्चेत असतो, त्याचप्रमाणं कारच्या यादीमध्ये आणि या वर्तुळामध्ये महिंद्रा थार चर्चेत होती आणि आताही आहे. ऑफरोडिंगसाठी प्राधान्य देणाऱ्यांसाठी ही कार परवणीच ठरली.
3/10
निस्सान मॅग्नाईट (Nissan Magnite) निस्सान मॅग्नाईटच्या दरांच्या बाबतीत कंपनीकडून घेण्यात आलेल्या निर्णयानं सर्वाचीच दाद मिळवली. बेस व्हॅरिएंटपेक्षाही कमी किंमतीत तुम्ही कोणतीही एसयुव्ही कार मिळते यावर विश्वास ठेवू शकत नाही. पण, मॅग्नाईट त्याला अपवाद ठरते.
4/10
एमजी ग्लोस्टर (MG Gloster) ऑन आणि ऑफ रोडिंग अनुभवासाठी ही कार एक उत्तम पर्याय. फुल साईज लक्जरी अनुभव देण्यासाठी ही कार ओळखली जाते. पैसे आणि त्या तुलनेत मिळणारा अनुभव या दोन्ही निकषांवर ही कार सर्व अपेक्षा पूर्ण करते.
5/10
मर्सिडीज बेंझ जीएलई (Mercedes-Benz GLE) A midsize luxury SUV रेंजमध्ये दमदार अनुभव देण्यासाठी ही कार ओळखली जाते. कारचे फिचर्स हे अपेक्षांची यादी पूर्ण करण्यासोबतच किंमतीच्या बाबतीतही अनेकांसाठीच एक चांगल पर्याय आहे.
6/10
मर्सिडीज बेंज ईक्यूसी (Mercedes-Benz EQC) फ्युचरिस्टीक स्टालिंग आणि किंमतीच्या बाबतीतही कारप्रेमींचं मन जिंकणारी ही (Mercedes-Benz EQC). एसयुव्ही कार क खरेदी करु इच्छिणाऱ्या आणि इलेक्ट्रीक मॉडेलच्या शोधात असणाऱ्यांसाटी (Mercedes-Benz EQC) ही एक उत्तम पर्याय ठरली.
7/10
लँड रोव्हर इवोक (Land Rover Evoque) या यादीमध्ये इवोकचा समावेश करण्यासाठी तिचे फिचर्स कारणीभूत ठरतात. किंमतीच्या बाबतीतही ही कार निराश करत नाही. अनेकदा कार खरेदी करण्यामागे ड्राईव्हिंगच्या अनुभवाचा आनंद घेणं हाही महत्त्वाचा हेतू असतो. अशासाठी ही कार उत्तम पर्याय.
8/10
किआ सॉनेट (Kia Sonet) SUVच्या मिडसाईज भागात ज्याप्रमाणं क्रेटानं अपेक्षा पूर्ण केल्या त्याचप्रमाणे काहीसे फिचर्स किआ सॉनेटमध्येही दिसून आले. किआ सॉनेट ही यंदाच्या वर्षातील एक कॉम्पॅक्ट एसयूव्ही ठरली.
9/10
ह्युंडाई क्रेटा (Hyundai Creta) SUVs प्रती असणाऱ्या प्रेमापोटी कार खरेदीला प्राधान्य देणाऱ्यांसाठी ह्युंडाई क्रेटा या कारला पहिली पसंती असते. क्रेटा लाँच झाल्या क्षणापासून या कारचा खप लक्षणीययरित्या वाढला आहे. या कारची खरेदी करणाऱ्यांना फिचर्सची एक लांबलचक यादी मिळते. क्वालिटी आणि एकंदर अनुभवाच्या बाबतीत क्रेटा सर्वच अपेक्षा पूर्ण करते.
10/10
ऑडी क्यू 2 (Audi Q2) A luxury SUV च्या बाबतीत अनेक अनपेक्षित आणि धमाकेदार फिचर्ससाठी ही कार ओळखली जाते. कारचे अंतरंग जसे मन जिंकतात, तसाच तिचा लूकही अनेकांचं लक्ष वेधणारं आहे.