एक्स्प्लोर
एकदा चार्ज केल्यावर 15 दिवस सुरू रहाणार, Pebble Spark स्मार्टवॉच लॉन्च
smartwatch
1/6

Pebble ने आपली नवीन स्मार्टवॉच लॉन्च केली आहे. कंपनीने या स्मार्टवॉचला Pebble Spark असे नाव दिले आहे.
2/6

पेबल स्पार्क स्मार्टवॉचमध्ये ब्लूटूथ कॉलिंग आणि इतर अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. याबाबत कंपनीचा दावा आहे की, विना चार्ज करता ही स्मार्टवॉच 5 दिवस सुरू राहील.
3/6

Pebble Spark ची विक्री केवळ ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टद्वारे केली जाईल. आजपासून ही विक्रीसाठी उपलब्ध आहे. ही स्मार्टवॉच 1,999 रुपये किमतीत लॉन्च करण्यात आली आहे.
4/6

Pebble Spark स्मार्टवॉचमध्ये 1.7-इंचाचा स्क्वेअर डायल आहे. या घड्याळात फुल-एचडी 240x280 पिक्सेल रिझोल्यूशन देण्यात आला आहे. Pebble Spark मध्ये वन-टॅप व्हॉईस असिस्टंट आणि फाइंड माय फोन यासारखी अनेक स्मार्ट फीचर्स देण्यात आली आहेत. ही स्मार्टवॉच वजनाने हलकी असून याचे वजन फक्त 45 ग्रॅम आहे.
5/6

पेबल स्पार्कमध्ये इनबिल्ट मायक्रोफोनही देण्यात आले आहे. याच्या मदतीने तुम्ही स्मार्टवॉचद्वारे कॉलचे उत्तर देऊ शकता. यात सायकलिंग, धावणे, टेनिस आणि बॅडमिंटन यांसारखे अनेक क्रीडा फीचर्स देण्यात आले आहेत.
6/6

पेबल स्पार्कमध्ये 180mAh बॅटरी देण्यात आली आहे. याबाबत कंपनीचा दावा आहे की, ती सतत 5 दिवस काम करते. याची बॅटरी स्टँडबाय मोडवर 15 दिवस टिकू शकते.
Published at : 19 Jul 2022 07:03 PM (IST)
आणखी पाहा























