एक्स्प्लोर
Pandharpur News: चंद्रभागेत 3 महिला भाविक बुडाल्या, 2 मृतदेह सापडले, एकाचा शोध सुरू, विठ्ठल दर्शनासाठी जालन्यावरून पंढरपुरला आलेल्या महिला
Pandharpur News: चंद्रभागेच्या पात्रात स्नानासाठी आलेल्या तीन भाविकांचा बुडून मृत्यू झाला असून यातील दोन महिलांचे मृतदेह सापडले आहेत. तर तिसऱ्या महिलेच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे.
Pandharpur News
1/8

पंढरपूर: पंढरपुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चंद्रभागेच्या नदी पात्रात बुडून आज (शनिवारी) सकाळी तीन महिला भाविकांचा मृत्यू झाला आहे.
2/8

चंद्रभागेच्या पात्रात स्नानासाठी आलेल्या तीन भाविकांचा बुडून मृत्यू झाला असून यातील दोन महिलांचे मृतदेह सापडले आहेत. तर तिसऱ्या महिलेच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे.
3/8

उजनी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे सध्या चंद्रभागा दुथडी भरून वाहत असून भाविकांना पाण्याचा अंदाज न येण्याने अशा पद्धतीच्या घटना घडू लागल्या आहेत. मात्र प्रशासनाने या ठिकाणी खबरदारीचे उपाययोजना न केल्यामुळे भाविकांचे मृत्यू झाल्याचे समोर येत आहे.
4/8

विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या तीन महिला भाविक आज सकाळी चंद्रभागा नदीत स्नानासाठी उतरल्या होत्या. जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे राहणार्या दोन महिला आणि एक अनोळखी महिला आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पाण्याचा अंदाज न आल्याने चंद्रभागेत बुडाल्या.
5/8

आज सकाळी पुंडलिक मंदिराजवळ स्नान करण्यासाठी नदीत या महिला भाविक उतरल्या होत्या. मात्र, त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही, त्यामुळे ही दुर्घटना घडली आहे.
6/8

नदीपात्रात स्नानास उतरलेल्या आपल्या सोबतच्या महिला भावीक बुडू लागल्यावर इतर महिलांनी आरडा ओरड करून मदतीसाठी पुकारणा केली. मात्र पाण्याचा प्रवाह वेगात असल्याने तिन्ही ही महिला बुडल्या.
7/8

सुनीता सपकाळ (वय 43) आणि संगीता सपकाळ (वय 40) या दोन महिला या भोकरदन तालुक्यातील आहेत आणि एक महिला अनोळखी असल्याचे समजते.
8/8

नंतर चंद्रभागेवरील कोळी बांधवांनी या बुडालेल्या दोन महिलांचा मृतदेह बाहेर काढला असून तिसऱ्या महिलेच्या मृतदेहाचा शोध अजूनही सुरू आहे. वास्तविक चंद्रभागेची पाणी पातळी वाढली असताना प्रशासनाने खबरदारीचे उपाय योजना करणे आवश्यक होते.
Published at : 19 Jul 2025 01:56 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
















