एक्स्प्लोर

Vikram Bhatt Arrested: 200 कोटींचं अमिष दाखवून 30 कोटींवर डल्ला; बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाला पत्नीसह अटक, नेमकं प्रकरण काय?

Vikram Bhatt Arrested: चित्रपटांच्या नावाखाली राजस्थानमध्ये एका डॉक्टरची 30 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप विक्रम भट्ट यांच्यावर लावण्यात आला आहे.

Vikram Bhatt Arrested: बॉलिवूडमध्ये (Bollywood News) खळबळ माजवणारी बातमी समोर आली आहे. मुंबईतील (Mumbai News) सुप्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक (Bollywood Director) विक्रम भट (Vikram Bhatt) आणि त्यांच्या पत्नीला अटक करण्यात आली आहे. प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक विक्रम भट्ट यांना राजस्थान पोलीस आणि मुंबई पोलिसांनी संयुक्त कारवाईत अटक करण्यात आली आहे. विक्रम भट्ट यांना रविवारी संध्याकाळी मुंबईतील अंधेरी पश्चिमेकडील यारी रोड परिसरातून ताब्यात घेण्यात आलं आहे. चित्रपटांच्या नावाखाली राजस्थानमध्ये एका डॉक्टरची 30 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे.

राजस्थान पोलिसांनी रविवारी मुंबईत प्रसिद्ध चित्रपट निर्माते विक्रम भट्ट यांना अटक केली. उदयपूर येथील उद्योजक आणि भारतीय इंदिरा ग्रुप ऑफ कंपनीजचे मालक डॉ. अजय मुरडिया यांची 30 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर आहे. पोलिसांच्या पथकानं विक्रम भट्ट यांना मुंबईतील यारी रोडवरील गंगा भवन अपार्टमेंटमधून अटक केली आहे. जिथून विक्रम भट्ट यांना पोलिसांनी अटक केली, ते त्यांच्या मेहुणीचं घर असल्याचं सांगितलं जातंय. आता त्यांना उदयपूरला नेण्यासाठी पोलीस वांद्रे न्यायालयात ट्रान्झिट रिमांड अर्ज दाखल करणार आहेत.

विक्रम भट्ट यांच्यावर आरोप काय? 

17 नोव्हेंबर रोजी, आयव्हीएफ हॉस्पिटलचे संस्थापक डॉ. मुरडिया यांनी विक्रम भट्ट यांच्यासह आठ जणांविरुद्ध FIR दाखल केलेला. एका कार्यक्रमादरम्यान त्यांची भेट दिनेश कटारिया यांच्याशी झाली, ज्यांनी डॉक्टरांच्या पत्नीवर बायोपिक बनवण्याचा प्रस्ताव दिलेला. असा दावा करण्यात आला होता की, हा संपूर्ण चित्रपट देशाला त्यांच्या पत्नीच्या योगदानाबद्दल माहिती देईल. या संदर्भात, डॉक्टरांना 24 एप्रिल 2024 रोजी मुंबईतील वृंदावन स्टुडिओमध्ये बोलावण्यात आलेलं. दरम्यान, नंतर असं उघड झालंय की, संपूर्ण प्रकरण फसवणुकीचं होतं आणि कोट्यवधी रुपये उकळण्यात आलेले. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, डॉ. मुरडिया यांनी असाही आरोप केला की, विक्रम भट्ट सातत्यानं सिनेमाच्या निर्मितीचं कारण देत पैशांची मागणी करायचे. 

विक्रम भट्ट यांच्याविरोधात लूक आऊट नोटीसही जारी करण्यात आलेली

विक्रम भट्ट यांच्याविरोधात लूक आऊट नोटीसही जारी करण्यात आलेली. 29 नोव्हेंबर रोजी उदयपूर पोलिसांनी विक्रम भट्ट आणि त्यांची पत्नी श्वेतांबरी भट्ट यांच्यासह इतर सहा आरोपींविरुद्ध लूकआउट नोटीस जारी केली. त्यांना 8 डिसेंबरपर्यंत उदयपूर पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. कायदेशीर नोटीसमध्ये त्यांना देशाबाहेर प्रवास करण्यासही मनाई करण्यात आली होती. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, या प्रकल्पासाठी विक्रम भट्ट यांनी ज्या कंपनीची माहिती दिलेली, ती कंपनी त्यांची पत्नी श्वेतांबरी भट्ट यांच्या नावानं VSP LLP नावाची कंपनी नोंदणीकृत होती.

याप्रकरणी राजस्थान पोलिसांनी विक्रम भट्ट आणि इतर सहा ते सात जणांच्या विरोधात 20 दिवसांपूर्वी गुन्हा दाखल केले होते. याच फसवणुकी प्रकरणी राजस्थान पोलिसांच्या एक टीमनं मुंबईच्या वर्सोवा पोलिसांचा मदतीनं विक्रम भट्ट आणि त्यांच्या पत्नीला यारी रोड परिसरातून अटक केली आहे. अटक केल्यानंतर राजस्थान पोलिसांनी हॉलिडे कोर्टात त्यांच्या ट्रान्झिट रिमांड घेऊन पुढील चौकशीसाठी राजस्थानला घेऊन निघाले आहेत. सुप्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम भट्ट यांना पोलिसांनी अटक केल्यामुळे बॉलिवूड हादरलं आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sambhajinagar Municipal Election Result : संभाजीनगरमध्ये ठाकरे नाही तर शिंदेंनाच भाजपचा मोठा धक्का
Ganesh Naik On Navi Mumbai : हा नवी मुंबईच्या जनतेचा विजय, गणेश नाईकांची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde On BMC : मुंबई महापालिकेची सत्ता युतीलाच मिळणार, एकनाथ शिंदेंचा शब्द
Thackeray Brothers : ठाकरेंची पिछाडी का? लोकांपर्यंत पोहोचायला ठाकरे कुठे कमी पडले
Sanjay Raut On BMC Election : ठाकरे बंधूंच्या अपयशानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी
Navi Mumbai Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
MNS Winning candidates BMC Election results 2026: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
MNS Winning candidates: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
Mira Bhayandar Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
Embed widget