Tridashank Yog 2025 : शनि-शुक्राचा महाशक्तिशाली 'त्रिदशांक योग' 'या' राशींना बनवणार धनवान; वर्षाच्या शेवटी बॅंक बॅलेन्स होणार दुप्पट
Tridashank Yog 2025 : न्यायदेवता शनी आणि शुक्र ग्रह एकमेकांच्या 108 डिग्रीवर आल्याने त्रिदशांक योग निर्माण झाला आहे. हा योग फार दुर्लभ आणि शुभ मानला जातो.

Tridashank Yog 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, न्यायदेवता शनी (Shani Dev) आणि शुक्र ग्रह एकमेकांच्या 108 डिग्रीवर आल्याने त्रिदशांक योग निर्माण झाला आहे. हा योग फार दुर्लभ आणि शुभ मानला जातो. हा योग जुळून आल्याने अनेक राशींच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येतील. तसेच, आर्थिक स्थितीत भरभराट होईल. त्यामुळे त्रिदशांक योगामुळे कोणकोणत्या राशींना (Zodiac Signs) लाभ मिळणार आहे ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी त्रिदशांक योग फार लाभदायी ठरणार आहे. या राशीच्या लोकांना मेहनतीचं चांगलं फळ मिळेल. तसेच, तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. लवकरच प्रवासाचे शुभ योग जुळून येतील. या कालावधीत तुम्हाला नवीन नोकरी देखील मिळू शकते. घरात आनंदी वातावरण राहील. तसेच, तुमच्या कामातून तुम्हाला समाधान मिळेल. कामाच्या ठिकाणी देखील वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचं कौतुक करतील. अनेकजण तुमच्या कामाचा आदर्श घेतील. व्यवसायाच्या ठिकाणी अनेक नवीन ऑर्डर्स येतील.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांना या कालावधीत प्रत्येक क्षेत्रात चांगला लाभ मिळेल. जोडीदाराबरोबर तुम्ही चांगला वेळ घालवाल. तसेच, या कालावधीत तुमची रखडलेली कामे तुम्हाला वेळेत पूर्ण करता येतील. पैशांची आवक वाढेल. तसेच, धार्मिक यात्रेला जाण्याचा देखील शुभ योग जुळून येणार आहे. तसेच, परदेशात नोकरी करण्याचं तुमचं स्वप्न लवकरच पूर्ण होऊ शकतं. मित्रांचा सहवास तुमच्यासाठी फार लाभदायी ठरणार आहे. तुमच्या मेहनतील यश मिळेल. कुटुंबियांबरोबर तुम्ही चांगला वेळ घालवाल. शुभ योगाचा प्रभाव लवकरच दिसून येईल.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी त्रिदशांक योग फार लाभदायी ठरेल. या काळात तुम्ही घेतलेल्या मेहनतीचं तुम्हाला शुभ फळ मिळेल. जुने वादविवाद असतील तर ते मिटतील. तसेच, तुमच्या नोकरीत पदोन्नतीची संधी मिळेल. दिर्घकालीन आजारातून तुमची सुटका होईल. तसेच, कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. तुमच्या मुलांच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. कामाच्या निमित्ताने तुम्हाला परदेशात जाण्याची संधी देखील मिळू शकते.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















