Shubman Gill Century : कर्णधार गिलचा पहिलाच 'हिट शो', कसोटी कॅप्टनसी डेब्यू अन् थेट ठोकले शतक, इंग्लंडसह जगही अवाक्
भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्यातल्या कसोटी मालिकेचा पहिला दिवस सलामीचा यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार शुभमन गिल यांच्या शतकांनी गाजवला.

Shubman Gill Century IND Vs ENG 1st Test : भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्यातल्या कसोटी मालिकेचा पहिला दिवस सलामीचा यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार शुभमन गिल यांच्या शतकांनी गाजवला. त्या दोघांनी झळकावलेल्या वैयक्तिक शतकांच्या जोरावर भारतानं तीन विकेट्सच्या मोबदल्यात तीनशे धावांचा पल्ला पार केला आहे. यशस्वी जैस्वालनं 16 चौकार आणि एका षटकारासह 101 धावांची खेळी उभारली. त्याने राहुलच्या साथीनं सलामीला 91 धावांची भागीदारी रचली. नव्या दमाचा साई सुदर्शन भोपळा फोडू शकला नाही.
HUNDRED from the Skipper! 💯
— BCCI (@BCCI) June 20, 2025
First match as Test Captain and Shubman Gill has scored a sublime century! 👏👏
His 6th Ton in Test cricket 🙌
Updates ▶️ https://t.co/CuzAEnBkyu#TeamIndia | #ENGvIND | @ShubmanGill pic.twitter.com/CVTE7wK2g0
कर्णधार गिलचा पहिलाच 'हिट शो'
पण शुभमन गिलने चौथ्या क्रमांकावर खेळून शतक साजरे केले. त्याचे कसोटी कारकीर्दीतले हे सहावे शतक ठरले. पण विशेष म्हणजे कसोटी कर्णधार या नात्यानं त्याने पहिल्याच दिवशी शतक साजरं केले. कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या विराट कोहलीच्या जागी गिल चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. संघाचे 2 फलंदाज 92 धावांवर पॅव्हेलियनमध्ये होते. गिलने यशस्वी (101) सोबत 164 चेंडूत 129 धावांची शानदार भागीदारी केली. यशस्वी आऊट झाल्यानंतर त्याने ऋषभ पंतसोबत संघाचा डाव पुढे नेला.
First Test century as India 𝓬𝓪𝓹𝓽𝓪𝓲𝓷 for Shubman Gill 💯#ENGvIND 📝: https://t.co/FXxW1HkGLm pic.twitter.com/dkaDdWvsmH
— ICC (@ICC) June 20, 2025
गिलने इतिहास रचला
कसोटी कर्णधार म्हणून पहिल्या डावात शतक झळकावून गिलने इतिहास रचला. पदार्पणाच्या कसोटीच्या पहिल्या डावात शतक झळकावणाऱ्या निवडक भारतीय कर्णधारांच्या यादीत तो सामील झाला आहे. त्याच्या आधी विजय हजारे (1951, दिल्ली), सुनील गावसकर (1976, ऑकलंड) आणि विराट कोहली (2014, अॅडलेड) यांनी ही कामगिरी केली होती.
मन्सूर अली खान पतौडी (1967) आणि सौरव गांगुली (2002) नंतर हेडिंग्ले येथे कसोटी शतक झळकावणारा गिल तिसरा भारतीय कर्णधार ठरला.
गिलने इंग्लंडमध्ये ठोकले पहिले शतक
गिलने इंग्लंडच्या भूमीवर पहिले शतकही केले आहे. त्याने आतापर्यंत या संघाविरुद्ध 11 सामने खेळले आहेत आणि 19 डावांमध्ये 41 पेक्षा जास्त सरासरीने 650 पेक्षा जास्त धावा करण्यात यश मिळवले आहे. 3 शतकांव्यतिरिक्त, 3 अर्धशतके देखील त्याच्या बॅटमधून आली आहेत. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 110 धावा आहे. त्याच्या कसोटी कारकिर्दीत या खेळाडूने इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक धावा केल्या आहेत.
गिलने पूर्ण केल्या 2000 कसोटी धावा
गिलने 2020 मध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला. त्याने आतापर्यंत 33 सामने खेळले आहेत आणि 60 डावांमध्ये 36 पेक्षा जास्त सरासरीने 2000 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. 6 शतकांव्यतिरिक्त, 7 अर्धशतके देखील त्याच्या बॅटमधून आली आहेत. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 128 धावा आहे. गिलने ही खेळी कांगारू संघाविरुद्ध खेळली होती.
𝐂𝐚𝐩𝐭𝐚𝐢𝐧 𝐌𝐚𝐫𝐯𝐞𝐥 🦸♂#SonySportsNetwork #GroundTumharaJeetHamari #ENGvIND #NayaIndia #DhaakadIndia #TeamIndia pic.twitter.com/S2mGsjPzTz
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) June 20, 2025





















