Mumbai Local Train Fight : मध्य रेल्वेच्या महिला डब्यात तुंबळ हाणामारी, व्हिडिओ व्हायरल
Mumbai Local Train Fight : मध्य रेल्वेच्या महिला डब्यात तुंबळ हाणामारी, व्हिडिओ व्हायरल
मध्य रेल्वेच्या लोकल डब्ब्यात महिलांची तुंबळ हाणावारी झाल्याच चित्र पाहायला मिळालं. महिलांच्या तुंबळ हाणावारीचा व्हिडिओ सध्या वायरल होतोय. एकमेकींच डोक फुटेपर्यंत या महिलांनी हाणामारी केलेली आहे. कल्याण रेल्वे पोलिसांकडून या व्हिडिओ संदर्भात आता चौकशी सुरू आहे. आणि आपले प्रतिनिधी सुरेश काटे सध्या आपल्या सोबत आहेत. त्यांच्याकडून आपण या संदर्भातले अधिक अपडेट्स घेऊयात. सुरेश ही नेमकी कुठल्या लोकल मध्ये? आणि कधी वाद झालेला आहे, कुठून कुठे जाणारी लोक, या सगळ्या बाबी तो कल्याण लो मार्ग पोलीस करत आहेत.
हे ही वाचा
छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांच्या प्रॉपर्टीवर देखील आता वंचित बहुजन आघाडीचे नेते अफसर खान आक्षेप घेतला आहे. पाच वर्षे आमदार आणि पाच वर्ष खासदार राहिलेल्या इम्तियाज जलील यांच्याकडे एवढी प्रॉपर्टी आली कुठून असा सवाल वंचित बहुजन आघाडीने उपस्थित केला आहे. पत्नीच्या नावे जलील यांनी खुलताबादमध्ये एक कोटीची प्रॉपर्टी घेतली आहे. शिवाय पूर्वी राहत असलेले मन्नत क्रमांक एक हे घर कोट्यावधीचे असताना केवळ 95 लाखात खरेदी केलं आहे. सोबतच आता राहत असलेला मन्नत टू बंगल्यावर देखील कोट्यावधी रुपयाचा खर्च केला असल्याचं आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते आफसर खान यांनी केला आहे. त्यामुळे पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या प्रॉपर्टीवर आक्षेप नोंदवणारे इम्तियाज जलील वंचित बहुजन आघाडीच्या आरोपावर काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.





















