एक्स्प्लोर

Jaykumar Gore : जयकुमार गोरे खंडणी प्रकरणात मोठी घडामोड, नवी दिल्लीतून ज्योतिषाला अटक,सातारा पोलिसांकडून नव्या अँगलनं तपास

Jaykumar Gore Case : जयकुमार गोरे खंडणी प्रकरणात नवी घडामोड समोर आली आहे. नवी दिल्लीतून एका ज्योतिषाला अटक करण्यात आली आहे.

सातारा/पुणे : राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना खंडणी मागितल्याबद्दल सातारामधील एका महिलेला काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती . त्या महिलेने दिल्लीतील अशोक छोटूलाल शर्मा या ज्योतिषाच्या सांगण्यावरून जयकुमार गोरेंना खंडणी मागितल्याचा दावा करत सातारा पोलिसांनी अशोक शर्माला दिल्लीतून अटक केली आहे. अशोक शर्माला सातारा न्यायालयात हजर करण्यात येणार असून त्याच्याशी प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष आणखी कोण कोण संपर्कात होते याचा तपास पोलीस करणार आहेत. 

मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून खंडणी वसूल करण्याच्या प्रकरणाला आणखी एक नाट्यमय वळण मिळालंय.सातारा पोलिसांनी दिल्लीतील लक्ष्मी नगर भागातून अशोक छोटूलाल शर्मा या ज्योतिषाला अटक केली आहे. सातारा पोलिसांनी मार्च महिन्यात मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून एक कोटी रुपयांची खंडणी घेतल्याच्या आरोपावरून चारुशीला मोहिते नावाच्या महिलेला अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी चारुशीला मोहितेचा मोबाईल तपासाला असता त्या जानेवारी महिन्यापासून व्हॉट्सअप चॅट, व्हिडीओ आणि ऑडिओ कोलच्या माध्यमातून अशोक शर्माशी संपर्कात असल्याचं समोर आलं. चारुशीला मोहिते यांनी शर्मासोबतचे चॅट आणि कॉलचे रेकॉर्ड डिलीट करून टाकले होते. मात्र, सायबर तज्ज्ञांच्या साहाय्याने पोलिसांनी तो डेटा पुन्हा मिळवला असता अशोक शर्माने चारुशीला मोहितेंना मंत्री जयकुमार गोरेंकडे तीन कोटी रुपयांची खंडणी मागायला सांगितल्याचं समोर आल्याचं पोलिसांचं म्हणणंय . 

अशोक शर्मा ज्योतिषी आहे आणि मांत्रिक देखील. दिल्लीतील लक्ष्मीनगर भागात त्याच कार्यालय असून त्याने ज्योतिष विद्येची पदवी देखील घेतलीय. देशातील अनेक धार्मिक कार्यक्रमांमध्ये तो सहभागी होत असतो. अशाच एका कार्यक्रमात जानेवारी महिन्यात चारुशीला मोहितेंची शर्मासोबत ओळख झाली. त्यानंतर चारुशीला मोहितेंनी शर्माकडे सल्ला मागण्यास सुरुवात केली असता शर्माने मोहितेंना मंत्री जयकुमार गोरेंकडे तीन कोटी रुपयांची खंडणी मागण्यास सांगितलं. 

जयकुमार गोरे यांच्यावर 2017 साली सर्वात आधी चारुशीला मोहितेंकडून लैंगिक छळाचा आरोप करण्यात आला होता . त्यावेळी आमदार असलेल्या जयकुमार गोरेंवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता . मात्र दोघांमध्ये न्यायालयात तडजोड  झाली होती . मात्र, चारुशीला मोहितेंनी पुन्हा यावर्षी मार्च महिन्यात जयकुमार गोरेंवर आरोप केल्याने खळबळ उडाली होती.राज्याच्या विधिमंडळात हे प्रकरण गाजलं होतं . त्यानंतर चारुशीला मोहितेंना मंत्री जयकुमार गोरेंच्या सहकाऱ्यांकडून एक कोटी रुपयांची खंडणी घेताना सातारा पोलिसांनी रंगेहात अटक केली होती.
 
या प्रकरणात जयकुमार गोरेंच्या राजकीय विरोधकांवर चारुशीला मोहितेंना मदत केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला . पोलिसांनी त्यानंतर रामराजे नाईक निंबाळकर , प्रभाकर देशमुख आणि प्रभाकर घारगे यांची चौकशी केली तर तुषार खरात या पत्रकाराला अटक केली. आता ज्योतिषी असलेल्या अशोक शर्माच्या संपर्कात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे  यापैकी कोणी होते का याचा तपास सातारा पोलीस करणार आहेत. 

मंत्री जयकुमार गोरेंशी संबंधित या प्रकरणात सुरुवातीपासून राजकीय आरोप - प्रत्यारोप होत आलेत . अनेक नाट्यमय घडामोडी या प्रकरणात पाहायला मिळाल्यात .आता याप्रकरणात एका मांत्रिक कम ज्योतिषाची देखील एंट्री झालीय. आता या अशोक शर्माच्या चौकशीतून आणखी कोण कोणाचं भविष्य घडतं किंवा बिघडतं हे सातारा  पोलिसांच्या पुढच्या काही दिवसांमधील कारवाईतून स्पष्ट होणार आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nilesh Rane: निवडणूक आयोगाला देखील कोर्टात खेचणार, अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर निलेश राणेंचा मोठा निर्णय; म्हणाले,  'ज्यांचा हातभार असेल त्यांच्यावर मी...'
निवडणूक आयोगाला देखील कोर्टात खेचणार, अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर निलेश राणेंचा मोठा निर्णय; म्हणाले, 'ज्यांचा हातभार असेल त्यांच्यावर मी...'
Gold Silver Rate : 2025 मध्ये सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, चांदी 2 लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता, सोन्याचे आजचे दर जाणून घ्या
2025 मध्ये सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, चांदी 2 लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता, सोन्याचे दर जाणून घ्या
Nagar Parishad and nagar panchayat Election: पुणे जिल्ह्यात दुपारी दिड वाजेपर्यंत 35.69 टक्के मतदान; जास्त टक्केवारी वडगावमध्ये तर सर्वांत कमी दौंडमध्ये
पुणे जिल्ह्यात दुपारी दिड वाजेपर्यंत 35.69 टक्के मतदान; जास्त टक्केवारी वडगावमध्ये तर सर्वांत कमी दौंडमध्ये
Hasan Mushrif: '...त्यावर बोलण्यात अर्थ नाही', उद्याची मतमोजणी रद्द, हायकोर्टाच्या निर्णयावर मंत्री हसन मुश्रीफांची मोजक्या शब्दात प्रतिक्रिया
'...त्यावर बोलण्यात अर्थ नाही', उद्याची मतमोजणी रद्द, हायकोर्टाच्या निर्णयावर मंत्री हसन मुश्रीफांची मोजक्या शब्दात प्रतिक्रिया
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Local Body Election Result : सर्व मतमोजणी 21 डिसेंबरला होणार,कोर्टाच्या निकालावर वकिलांचं विश्लेषण
Rohit Pawar On Voting : सर्वसामान्य जनता शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पाठिशी - रोहित पवार
Devendra Fadnavis PC आयोगाने प्रक्रियेत सुधारणा करावी, मतमोजणी पुढे ढकलल्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया
Sandeep Kshirsagar On Voting : निवडणूक हातातून गेल्यानं पैसे वाटपाचा प्रकार - संदीप क्षीरसागर
Vaibhav Naik On Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनीच मालवणात पैशांच्या बॅगा आणल्या, वैभव नाईकांचा आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nilesh Rane: निवडणूक आयोगाला देखील कोर्टात खेचणार, अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर निलेश राणेंचा मोठा निर्णय; म्हणाले,  'ज्यांचा हातभार असेल त्यांच्यावर मी...'
निवडणूक आयोगाला देखील कोर्टात खेचणार, अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर निलेश राणेंचा मोठा निर्णय; म्हणाले, 'ज्यांचा हातभार असेल त्यांच्यावर मी...'
Gold Silver Rate : 2025 मध्ये सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, चांदी 2 लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता, सोन्याचे आजचे दर जाणून घ्या
2025 मध्ये सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, चांदी 2 लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता, सोन्याचे दर जाणून घ्या
Nagar Parishad and nagar panchayat Election: पुणे जिल्ह्यात दुपारी दिड वाजेपर्यंत 35.69 टक्के मतदान; जास्त टक्केवारी वडगावमध्ये तर सर्वांत कमी दौंडमध्ये
पुणे जिल्ह्यात दुपारी दिड वाजेपर्यंत 35.69 टक्के मतदान; जास्त टक्केवारी वडगावमध्ये तर सर्वांत कमी दौंडमध्ये
Hasan Mushrif: '...त्यावर बोलण्यात अर्थ नाही', उद्याची मतमोजणी रद्द, हायकोर्टाच्या निर्णयावर मंत्री हसन मुश्रीफांची मोजक्या शब्दात प्रतिक्रिया
'...त्यावर बोलण्यात अर्थ नाही', उद्याची मतमोजणी रद्द, हायकोर्टाच्या निर्णयावर मंत्री हसन मुश्रीफांची मोजक्या शब्दात प्रतिक्रिया
Girish Mahajan on Eknath Khadse: एकनाथ खडसे म्हणाले, गिरीश महाजनांसारखा मी वाया गेलो नाही, आता महाजनांकडून जशास तसं उत्तर; म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या रेसमधला माणूस असा...
एकनाथ खडसे म्हणाले, गिरीश महाजनांसारखा मी वाया गेलो नाही, आता महाजनांकडून जशास तसं उत्तर; म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या रेसमधला माणूस असा...
Nagarparishad Election Result: उद्याची मतमोजणी रद्द; हायकोर्टाचा मोठा निर्णय, आता काय परिणाम होणार? जाणून घ्या सविस्तर
उद्याची मतमोजणी रद्द; हायकोर्टाचा मोठा निर्णय, आता काय परिणाम होणार? जाणून घ्या सविस्तर
Nagarparishad Election Result: निकालाची तारीख पुढे जाताच देवेंद्र फडणवीस प्रचंड नाराज, म्हणाले, 'निवडणूक आयोगाचे वकील...'
निकालाची तारीख पुढे जाताच देवेंद्र फडणवीस प्रचंड नाराज, म्हणाले, 'निवडणूक आयोगाचे वकील...'
Mahad Nagarparishad Election: सुनील तटकरेंनी हल्ला करायला लोकं पाठवली, माझ्यावर रिव्हॉल्व्हर रोखली, कार्यकर्त्याने चपळाई दाखवत.... विकास गोगावलेंनी स्टार्ट टू एंड सगळं सांगितलं
माझ्या कार्यकर्त्याने रिव्हॉल्व्हर हिसकावली नसती तर मला गोळी लागली असती, भरत गोगावलेंच्या मुलाचा खळबळजनक दावा
Embed widget