एक्स्प्लोर
अंबोली घाटातला धबधबा पर्यटकांसाठी सायंकाळी 5 नंतर बंद ठेवण्याचा निर्णय; शनिवार-रविवारी सुरक्षेसाठी प्रशासनाचा निर्णय
मुख्य धबधब्यावरील पर्यटकांना खाली उतरवून धबधब्यावर जाणाऱ्या पर्यटकांना मज्जाव करण्यात येणार असून सायंकाळी पाच वाजल्यानंतर मुख्य धबधबा बंद करण्यात येणार आहे.
amboli waterfall
1/10

पावसाळ्यात आंबोलीतील मुख्य धबधबा परिसरात मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.
2/10

वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर शनिवार-रविवार सायंकाळी ५ वाजल्यानंतर मुख्य धबधबा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे.
3/10

मुख्य धबधबा, हिरण्यकेशी, कावळेसाद, महादेवगड पॉईंट या ठिकाणी आता शनिवार आणि रविवार सायंकाळी 5 नंतर प्रवेशास मज्जाव असणार आहे.
4/10

5 वाजता धबधबा परिसरात असलेल्या पर्यटकांना खाली उतरवण्यात येणार आहे आणि नवीन पर्यटकांना वर जाण्याची परवानगी दिली जाणार नाही.
5/10

सर्व स्टॉलही 5 वाजता बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
6/10

पावसामुळे अंबोली घाटात सुरु झालेल्या धबधब्यामुळे परिसरात दृश्यमानता कमी होते.
7/10

त्यामुळे ज्या भागात दृश्यमानता कमी असेल अशा भागात पर्यटकांना जाण्यास मज्जाव करण्यात आला असून परिस्थितीनुरुप पुढील निर्देश केले जातील
8/10

असे आदेश पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी सांगितलं.
9/10

अंबोली घाटात सध्या सुंदर निसर्गसौंदर्य पर्यटकांसह प्रवाशांना पहायला मिळत आहे.
10/10

हिरवाईसह धबधब्यांचं सुंदर दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची पावले या भागात वळली आहेत.
Published at : 01 Jun 2025 05:15 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
नाशिक
मुंबई





















