एक्स्प्लोर

Post Office Scheme : पोस्टाच्या 'या' योजनेत खातं उघडा,5 लाखांच्या ठेवीवर 5 वर्षात सव्वा दोन लाखांचा फायदा होणार

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेतील गुंतवणुकीची सुरुवात तुम्ही किमान 1000 रुपयांपासून सुरुवात करु शकता.   

नवी दिल्ली : सध्या गुंतवणुकीचे अनेक पर्याय गुंतवणूकदारांसमोर उपलब्ध असतात. गुंतवणूकदारांकडून बँकेत मुदत ठेव, शेअर बाजारात गुंतवणूक, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली जाते. एसआयपीद्वारे अनेक जण म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतात. मात्र, पोस्टाच्या बचत योजना देखील लोकप्रिय आहेत. पोस्टाच्या बचत योजनांवर गुंतवणूकदारांचा मोठा विश्वास असल्याचं पाहायला मिळतं. पोस्टाची  राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र ही योजना सुरक्षित आणि करबचतीसाठी फायदेशीर योजना आहे. पोस्टाच्या या योजनेत गुंतवलेले पैसे केवळ सुरक्षित राहत नाहीत तर त्याच्यावर निश्चित व्याज मिळतं. याचा गुंतवणूकदारांना मोठा फायदा होता. 

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र ही पोस्ट ऑफिसची बचत योजना आहे. या योजनेत किमान 1000 रुपयांची गुंतवणूक करता येते. या योजनेत 5 वर्ष गुंतवणूक कायम ठेवावी लागते. एकदा पाच वर्ष गुंतवणूक केल्यानंतर या योजनेतून पैसे काढता येत नाहीत. या योजनेत वार्षिक 7.7 टक्के व्याज मिळतं. हे व्याज कम्पाऊंडिंगद्वारे दिलं जातं. 

या योजनेत किमान 1000 रुपये आणि त्यापुढं 100 च्या पटीत जितकी गुंतवणूक करायची आहे तितकी करता येईल. कमाल किती रक्कम गुंतवावी याची मर्यादा नाही. म्हणजेच तुमची जितकी बचत असेल त्याच्या प्रमाणात परतावा मिळेल. 

जर एखाद्या गुंतवणूकदाराच्या मुलाचं वय 10 वर्ष आहे, तर त्या मुलाच्या नावानं राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राचं खातं उघडता येईल. जर मुलाचं किंवा मुलीचं वय 10 वर्षांपेक्षा कमी असेल तर आई वडील मुलांच्या वतीनं खातं उघडू शकतात. यामुळं मुलांना लहाणपणापासून बचत करण्याची सवय लागेल. 

जर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रात 5 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर वार्षिक 7.7 टक्के चक्रवाढ व्याजदरानुसार 5 वर्षात ही रक्कम 724517 रुपये इतकी होईल. तुम्हाला पाच वर्षात 224517 रुपयांचं व्याज मिळेल. हे व्याज  ठेव कालावधी पूर्ण झाल्यानंतर मिळेल. राष्ट्रीय  बचत प्रमाणपत्र  ही एक सुरक्षित आणि निश्चित परतावा देणारी योजना आहे. प्रामुख्यानं मुलांच्या भविष्यासाठी गुंतवणूक करण्याची विश्वासार्ह योजना आहे. या योजनेत व्याज दरवर्षी जमा रकमेत  जमा होतं. पुढील वर्षी जमा झालेल्या रकमेवर व्याज मिळतं. 

 राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेत लहान मुलांच्या नावानं खातं उघडता येतं. 10 वर्षांपेक्षा मुलांचं वय कमी असल्यास  आई वडील ते खातं चालवू शकतात. पाच वर्षांच्या अगोदर खातं बंद करायचं असल्यास मूळ रक्कम परत केली जाईल. व्याज दिलं जात नाही. या योजनेतील गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित असून सरकारकडून योजनेचं दायित्व घेतलं जातं. 

जर तुम्हाला गुंतवणूक करायची आहे आणि अधिक जोखीम न घेता चांगला परतावा हवा असेल तर राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र चांगला पर्याय आहे. जर तुमच्याकडे मोठी रक्कम असेल तर तुम्ही दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा पर्याय वापरू शकता. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Larry Ellison : एलन मस्कला पिछाडीवर टाकणारा जगातील दुसरा श्रीमंत व्यक्ती 95 टक्के संपत्ती दान करणार, लॅरी एलिसन यांची नेटवर्थ किती?
एलन मस्कला पिछाडीवर टाकणारा जगातील दुसरा श्रीमंत व्यक्ती 95 टक्के संपत्ती दान करणार, लॅरी एलिसन यांची नेटवर्थ किती?
महापालिकेनं अनधिकृत घोषित केलेल्या हॉटेलविरुद्धची याचिका हायकोर्टाने फेटाळली; मनसेच्या राजू पाटलांना दणका
महापालिकेनं अनधिकृत घोषित केलेल्या हॉटेलविरुद्धची याचिका हायकोर्टाने फेटाळली; मनसेच्या राजू पाटलांना दणका
Suryakumar Yadav : आयसीसीकडून सूर्यकुमार यादवला वॉर्निंग? सूर्या नेमकं काय चुकीचं बोललेला? PCB च्या तक्रारीवर सुनावणी पूर्ण, निर्णय कधी?
ICC कडून सूर्यकुमार यादवला वॉर्निंग? सूर्या नेमकं काय चुकीचं बोललेला? PCB च्या तक्रारीवर सुनावणी पूर्ण, निर्णय कधी?
गोगावले शेठ, आमच्या तळवटाचे पैसेसुद्धा निघत नाहीत; बार्शीत शेतकऱ्यांनी अडवला मंत्र्यांचा ताफा, गाडीलाच आडवे
गोगावले शेठ, आमच्या तळवटाचे पैसेसुद्धा निघत नाहीत; बार्शीत शेतकऱ्यांनी अडवला मंत्र्यांचा ताफा, गाडीलाच आडवे
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Omraje Nimbalkar Video : गळ्याएवढ्या पाण्यात बाजी लावली,  'कोहीनूर' ओमराजेंचा UNCUT व्हिडीओ
Sharad Pawar| Gorakshak मुळे शेतकऱ्यांचे हाल: म्हशी विकल्या तरी अडवणूक : शरद पवार
Azam Khan Bail : आझम खान दोन वर्षांनंतर तुरुंगातून सुटणार? शेवटच्या गुन्ह्यातही मिळाला जामीन
Parbhani Lower Dhudhna : परभणीलाही पावसाने झोडपलं, लोअर दुधना प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग
Heavy Rain In Marathwada : मराठवाड्यात जनजीवन ठप्प, Dharashiv, Beed, Jalna मध्ये थैमान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Larry Ellison : एलन मस्कला पिछाडीवर टाकणारा जगातील दुसरा श्रीमंत व्यक्ती 95 टक्के संपत्ती दान करणार, लॅरी एलिसन यांची नेटवर्थ किती?
एलन मस्कला पिछाडीवर टाकणारा जगातील दुसरा श्रीमंत व्यक्ती 95 टक्के संपत्ती दान करणार, लॅरी एलिसन यांची नेटवर्थ किती?
महापालिकेनं अनधिकृत घोषित केलेल्या हॉटेलविरुद्धची याचिका हायकोर्टाने फेटाळली; मनसेच्या राजू पाटलांना दणका
महापालिकेनं अनधिकृत घोषित केलेल्या हॉटेलविरुद्धची याचिका हायकोर्टाने फेटाळली; मनसेच्या राजू पाटलांना दणका
Suryakumar Yadav : आयसीसीकडून सूर्यकुमार यादवला वॉर्निंग? सूर्या नेमकं काय चुकीचं बोललेला? PCB च्या तक्रारीवर सुनावणी पूर्ण, निर्णय कधी?
ICC कडून सूर्यकुमार यादवला वॉर्निंग? सूर्या नेमकं काय चुकीचं बोललेला? PCB च्या तक्रारीवर सुनावणी पूर्ण, निर्णय कधी?
गोगावले शेठ, आमच्या तळवटाचे पैसेसुद्धा निघत नाहीत; बार्शीत शेतकऱ्यांनी अडवला मंत्र्यांचा ताफा, गाडीलाच आडवे
गोगावले शेठ, आमच्या तळवटाचे पैसेसुद्धा निघत नाहीत; बार्शीत शेतकऱ्यांनी अडवला मंत्र्यांचा ताफा, गाडीलाच आडवे
Pranjal Khewalkar : एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांना जामीन मंजूर, पुणे सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय, आता तुरुंगाबाहेर कधी येणार?
प्रांजल खेवलकर यांना जामीन मंजूर, पुणे सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय, आता तुरुंगाबाहेर कधी येणार?
MPSC पूर्व परीक्षा पुढे ढकला, सध्या विद्यार्थ्यांची मानसिकता नाही; जयंत पाटलांची सरकारकडे मोठी मागणी
MPSC पूर्व परीक्षा पुढे ढकला, सध्या विद्यार्थ्यांची मानसिकता नाही; जयंत पाटलांची सरकारकडे मोठी मागणी
झोपडीत राहणारी 'परी', उद्धव ठाकरेंनी पूरबाधित गरिबाचं घर पाहिलं; चिमुकलीला जवळ घेऊन नाव विचारलं
झोपडीत राहणारी 'परी', उद्धव ठाकरेंनी पूरबाधित गरिबाचं घर पाहिलं; चिमुकलीला जवळ घेऊन नाव विचारलं
फडणवीसांनी तुमचं काय घोडं मारलंय? ऑनलाईन लॉटरी घोटाळ्याची, सांगली जिल्हा बँकेची चौकशी लागलीच पाहिजे, आता सोडणार नाही; चंद्रकांत पाटलांनी सांगलीत जयंतरावांविरोधात दंड थोपटले
फडणवीसांनी तुमचं काय घोडं मारलंय? ऑनलाईन लॉटरी घोटाळ्याची, सांगली जिल्हा बँकेची चौकशी लागलीच पाहिजे, आता सोडणार नाही; चंद्रकांत पाटलांनी सांगलीत जयंतरावांविरोधात दंड थोपटले
Embed widget