एक्स्प्लोर
Satara News : खासदार उदयनराजे भोसलेंच्या जलमंदिर निवासस्थान परिसरातील 'बाजीराव विहीर' झळकली पोस्टकार्डवर! राज्यातील आठ ऐतिहासिक विहिरींचा समावेश
महाराष्ट्रातील आठ विहिरींच्या छायाचित्राचा समावेश पोस्टाच्या पुस्तिकेत केला आहे. नाशिक, अमरावती, पुणे, सातारा या जिल्ह्यातील प्रत्येकी एका तर परभणी जिल्ह्यातील चार अशा एकूण आठ विहिरींचा समावेश आहे.

Satara News
1/8

सातारमधील खासदार उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर निवासस्थान परिसरात असलेल्या ऐतिहासिक ‘बाजीराव विहिरी’चे छायाचित्र पोस्टकार्डवर झळकलं आहे.
2/8

राष्ट्रीय पोस्ट दिनाचे औचित्य साधून केंद्रीय डाकघर विभागाने स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या विहिरीचा सन्मान केला.
3/8

केंद्रीय डाक विभागाने राष्ट्रीय पोस्ट दिनानिमित्त भारतातील उल्लेखनीय विहिरींचे निरीक्षण केले.
4/8

महाराष्ट्रातील आठ विहिरींच्या छायाचित्राचा समावेश पोस्टाच्या पुस्तिकेत केला आहे.
5/8

यामध्ये नाशिक, अमरावती, पुणे, सातारा या जिल्ह्यांतील प्रत्येकी एका तर परभणी जिल्ह्यातील चार अशा एकूण आठ विहिरींचा समावेश आहे.
6/8

छत्रपती राजाराम महाराज यांनी स्वराज्याची राजधानी रायगडावरून किल्ले अजिंक्यतारा येथे स्थापन केली.
7/8

चौथ्या राजधानीचा मान मिळालेल्या या किल्ल्यावरूनच छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्यकाळात अटकेपार झेंडा फडकवला गेला.
8/8

त्यांच्याच काळात सध्याच्या जलमंदिर पॅलेसचा भाग असणारी बाजीराव विहीर बांधण्यात आली.
Published at : 13 Oct 2023 04:52 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
पुणे
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
