एक्स्प्लोर
Diwali 2025: सज्जनगड उजळला भक्तीच्या तेजात!
Diwali 2025:दिवाळीच्या पहाटे हजारो मशालींनी गड प्रकाशमय; भक्तिरस, इतिहास आणि शौर्याचा अनोखा संगम.
Diwali 2025
1/12

सज्जनगडावर दिवाळीची पहिली पहाट मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
2/12

शेकडो मशालींच्या प्रकाशाने सज्जनगड भक्तीच्या तेजात उजाळला होता.
3/12

या भव्य आणि पारंपारिक मशाल महोत्सवाचे आयोजन सज्जनगड दुर्गनाद प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले होते.
4/12

पहाटे चार वाजताच (वाहनतळ) येथून फुलांनी सजवलेल्या पालखीत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीची मिरवणूक सुरू झाली.
5/12

ढोल-ताशांच्या गजरात, फुलांच्या वर्षावात आणि रांगोळीच्या सजावटीतून पालखीचा मार्ग प्रकाशमान झाला.
6/12

पालखीच्या मागे शेकडो मावळे मशाली हातात घेऊन ‘जय शिवाजी’च्या घोषात गाईमुख, श्री छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार, श्री समर्थ महाद्वार या पारंपारिक मार्गाने पालखी अंगलाई मंदिरात पोहोचली.
7/12

या वेळी शेकडो मशालींच्या ज्योतीने तसेच फटाक्यांच्या आतषबाजीमुळे तटबंदी उजळली आणि खालील परळी पंचक्रोशीवर त्या प्रकाशाची झळाळी उमटली.
8/12

समाधी मंदिर परिसरात छत्रपतींच्या पालखीचे आगमन होताच संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले.
9/12

आशोक वनात सहासी खेळाबरोबरच शाहिर रंगराव पाटील (कोल्हापूर) यांचा शिवकालीन ऐतिहासीक पोवाड्याचा कार्यक्रम सादर करण्यात आला, तसेच सर्व भक्तांनी मिळून “ध्येय मंत्र” म्हणत एकात्मतेचा संदेश दिला.
10/12

यावेळी विविध जिल्ह्यातून भाविकांनी आपली उपस्थिती दर्शवली होती.
11/12

या वेळी शिवरायांच्या पवित्र भूमीवर शेकडो मशालींच्या तेजाने उजळलेला सज्जनगड पाहताना प्रत्येकाच्या मनात अभिमान आणि भावनांचा संगम दाटून आला होता.
12/12

या सर्व कार्यक्रमाचे उत्तम आयोजन सज्जनगड दुर्गनाद प्रतिष्ठान कडून करण्यात आले होते.
Published at : 21 Oct 2025 12:46 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नवी मुंबई
व्यापार-उद्योग
यवतमाळ
क्रिकेट
























