एक्स्प्लोर
सेल्फी अन् रिल्ससाठी जीवघेणा स्टंट, सज्जनगडावरील कड्यांवर उभे राहून पर्यटकांचे फोटोशूट
सध्या पावसाळ्याचे दिवस असून निसर्ग पर्यटनाचा आनंद पर्यटक घेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पावसाळ्यात अति साहस करणाऱ्या पर्यटकांनी फोटो आणि रील्सच्या नादात जीव गमावल्याचे वृत्त माध्यमांत झळकले आहे.
Satara sajjangarh stunt for selfie and reels
1/7

सध्या पावसाळ्याचे दिवस असून निसर्ग पर्यटनाचा आनंद पर्यटक घेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पावसाळ्यात अति साहस करणाऱ्या पर्यटकांनी फोटो आणि रील्सच्या नादात जीव गमावल्याचे वृत्त माध्यमांत झळकले आहे.
2/7

साताऱ्यातील सज्जनगड येथे काही पर्यटकांकडून असाच एक अति उत्साही धाडसाचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसून येत आहे. येथील कड्यावर उभे राहून युवक सेल्फी आणि रिल्ससाठी व्हिडिओ घेत आहेत.
3/7

ABP माझाच्या हाती येथील घटनेचा व्हिडिओ आला असून साताऱ्यातील सज्जनगड येथील अतिशय धोकादायक एका कड्यावरून युवक फोटो काढण्यासाठी आपला जीव धोक्यात घालत आहेत.
4/7

निसर्गाचं अद्भुत रूप बघण्यासाठी आलेले पर्यटक अति उत्साहीपणात डोंगराच्या अगदी कडेला येऊन फोटो किंवा रिल्स काढण्यासाठी येत असतात, त्यामुळे अनेक दुर्घटना घडतात.
5/7

प्रामुख्याने याच कड्यावरून फोटो काढण्याच्या नादात काही दुर्घटना घडल्या आहेत. तसेच, उडी मारून अनेक नागरिकांनी आपला जीव देखील संपवला आहे.
6/7

सज्जनगड प्रशासन आणि सातारा पोलीस प्रशासन याबाबत काय खबरदारी घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून पर्यटकांनी जीव धोक्यात घालून सेल्फी किंवा रील्स बनवू नये, असे आवाहनही केले जात आहे.
7/7

दरम्यान, सज्जनगड हा निसर्गाच्या सानिध्यात असून सह्याद्रीच्या डोंगररांगातील महादेव डोंगररांगात आहे. त्यामुळे, येथील गडावरुन निसर्ग सौंदर्याचा अद्भूद चमत्कार पाहायला मिळतो.
Published at : 03 Aug 2025 07:53 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























